MLC Election Results l नागपूर पदवीधर निवडणुकीत अभिजित वंजारी विजयी

MLC Election Results l नागपूर पदवीधर निवडणुकीत अभिजित वंजारी विजयी

Published : Oct 29, 2026, 12:02 PM IST

नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे अभिजित वंजारी पुन्हा विजयी झाले. गेल्या सहा वर्षांत पदवीधर, विद्यार्थी आणि रोजगाराच्या प्रश्नांवर केलेल्या कामामुळे विजय मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात भाजपला पराभूत केल्याचा आनंद व्यक्त करत आता हा काँग्रेसचा गड राहील, असा दावा त्यांनी केला. महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील तीनही पदवीधर मतदारसंघ जिंकल्याचे सांगत राहुल गांधींमुळे तरुण काँग्रेसकडे वळत असल्याचे ते म्हणाले. तसेच ईव्हीएम बंद करण्याची मागणीही त्यांनी केली.