
Description: कर्जतच्या साई डोंगरातील वृक्षतोडीची पाहणी करत मनोज जरांगे पाटील यांनी टोरेंट प्रकल्पाला विरोध केला. सह्याद्री उद्ध्वस्त करून पर्यावरणपूरक विकासाचा दावा कसा करता, असा प्रश्न त्यांनी फडणवीस सरकारला विचारला. वृक्षलागवडीच्या आश्वासनांवरही त्यांनी टीका केली. स्थानिकांना विश्वासात घेऊन वृक्षतोड थांबवावी आणि ३ तारखेचे प्रस्तावित उद्घाटन रद्द करावे, अशी मागणी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांकडे केली. सह्याद्री वाचवण्यासाठी सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन करत स्थानिकांच्या शांततापूर्ण आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला. तसेच उद्योगपतींच्या फायद्यासाठी स्थानिकांचे नुकसान होत असल्याचा आरोप करत गुजरातला वीज नेण्याच्या चर्चेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.