Manoj Jarange Patil l मनोज जरांगेंची फडणवीस-शिंदेंकडे तपासाची मागणी

Manoj Jarange Patil l मनोज जरांगेंची फडणवीस-शिंदेंकडे तपासाची मागणी

Published : Oct 29, 2026, 11:02 AM IST

व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणात मुंबई पोलिसांनी एसआयटी स्थापन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सखोल तपासाची मागणी केली. पडद्यामागील कटाचा छडा लावण्याचे आवाहन त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना केले. शिंदेंनी पैसे घेतले नसतील तर संबंधितांना सोडू नये, असे ते म्हणाले. फडणवीस यांना या प्रकरणाची माहिती नसावी, असा अंदाज व्यक्त करत तपासातून सत्य समोर न आल्यास त्यांच्यावरही संशय निर्माण होईल, असा इशारा दिला. व्हायरल क्लिपमधील भाषा आणि शब्दप्रयोग आपले नसल्याचा दावा करत भाजप प्रवक्त्यांवरही त्यांनी टीका केली.