Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीवेळी या '4M' वर असणार निवडणूक आयोगाची करडी नजर, अशी करण्यात आलीय तयारी

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी (16 मार्च) पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. याशिवाय लोकसभा निवडणुकीवेळी आयोगासमोर कोणती आव्हाने असणार याबद्दलचे मुद्देही राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहेत.

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठीच्या तारख्या अखेर जाहीर करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी (16 मार्च) लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. याशिवाय निवडणुकीदरम्यान आयोगासमोर कोणती आव्हाने असणार याबद्दलची सांगितले. याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

बळाचा वापर (Muscle)
निवडणुकीदरम्यान, बळाचा वापर केला जात असणे त्यावर तोडगा काढण्याचे सर्वाधिक मोठे आव्हान निवडणूक आयोगासमोर असते. काही राज्यांमध्ये निवडणुकीवेळी आणि त्यानंतर हिंसाचार होतो. यापासून दूर राहण्यासाठी निवडणूक आयोगाने आधीच तयारी केली आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणुकीदरम्यान हिंसाचार झालेत तेथे पुरेशा प्रमाणात सीआरपीएफचे (CRPF) जवान तैनात करण्यात आले आहेत. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये कंट्रोल रूम तयार केली जाणार आहे. येथे एक वरिष्ठ अधिकारी देखील 24 तास थांबणार आहे. कोणतीही तक्रार आल्यानंतर तातडीने कार्यवाही केली जाणार आहे. संवेदनशील परिसरात मतदान केंद्रावरुन वेबकास्टिंग केले जाणार आहे. एकूण मतदान केंद्रांपैकी कमीत कमी 50 टक्के बेवकास्टिंग केले जाणार आहे. हत्यारे जप्त केली जाणार आहेत. याशिवाय गुन्हेगारांवर करडी नजर ठेवली जाणार आहे. संपूर्ण देशात चेक पोस्ट उभारण्यासह राज्यांच्या सीमांवर ड्रोनच्या मदतीने नजर ठेवली जाणार आहे.

पैशांचा चुकीच्या पद्धतीने वापर (Money)
पैसे आणि मोफतच्या सामानाचे आश्वासन देत मतदारांना भुरळ पाडणे एक मोठे आव्हान आहे. निवडणूक आयोगाने अशा प्रकारांवर बंदी घालण्यासाठी कार्यवाही करत आहे. गेल्या 11 विधानसभा निवडणुकीत एकूण 3400 कोटी रुपये जप्त करण्यात आले होते. निवडणूक आयोगाने पैशांच्या वापराविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश एजेंसीना दिले आहेत. याशिवाय दारु, पैसा, मोफतचे सामान आणि ड्रग्ज नागरिकांपर्यंत पोहोचणार नाहीत याची देखील काळजी घेतली जाणार आहे. ऑनलाइन पैसे पाठवून मतदारांना भुलवण्याचा प्रयत्न केला तरीही निवडणूक आयोगाकडून कार्यवाही केली जाणार आहे. सूर्यास्तानंतर बँकेच्या गाडीतून रोख रक्कम पाठवली जाणार नाही. खासगी विमानांवर लक्ष ठेवण्यासह त्यांचीही तपासणी केली जाणार आहे.

बनावट बातम्या (Misinformation)
निवडणुकीच्या काळात बनावट बातम्या सोशल मीडियावर पसरवण्यापासून रोखणे एक मोठे आव्हान आहे. यामुळे आधीच निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना ताकीद दिलीयकी, त्यांनी आपल्या सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट करताना खबरदारी घ्यावी. याशिवाट बनावट आणि खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांच्या विरोधात कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक राज्यात नोडल अधिकारी तैनात केले जाणार आहेत. या नोडल अधिकाऱ्यांकडून आयटी कलम 79(3)(बी) च्या अधिकारांचा वापर करून सोशल मीडियावर बनावट आणि खोट्या बातम्या हटवणार आहेत. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर बनावट आणि खोट्या बातम्यांबद्दल फॅक्ट चेकचा (Fact Check) सेगमेंट सुरू केला जाणार आहे.

आदर्श आचार संहितेचे उल्लंघन (MCC Violations)
निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी राजकीय पक्षांकडून आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केले जाते. या प्रकारांना रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांसाठी कठोर गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. राजकीय पक्षांना सांगण्यात आले आहे की, त्यांच्या नेत्यांनी धर्म आणि जातीच्या आधारावर भाषणे देऊ नये. याशिवाय द्वेष पसरवणाऱ्या गोष्टी बोलू नये. नेत्यांनी वैयक्तिक टीका करणे टाळावे. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे, दिशाभूल करणाऱ्या जाहिराती करू नये. निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी जबाबदारीने बोलावे.

आणखी वाचा : 

Lok Sabha Election 2024 : देशात सात टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, पहिल्या टप्प्यातील निवडणूक 19 एप्रिलला

Maharashtra Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभा निवडणूक होणार, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषदेत माहिती

Assembly Election 2024 : देशातील चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर, जाणून घ्या कुठे आणि कधी पार पडणार मतदान

Read more Articles on
Share this article