अयोध्या नगरीत Light and Sound Show पाहण्यासाठी नागरिकांमध्ये मोठा उत्साह, पाहा व्हिडीओ

Published : Jan 16, 2024, 05:17 PM ISTUpdated : Jan 16, 2024, 05:20 PM IST
ayyodhya light sound show

सार

रामललांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा येत्या 22 जानेवारीला अयोध्येत पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्येत लाइट अ‍ॅण्ड साउंड शो चे आयोजन करण्यात येत आहे. या शो ला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद दिला जात आहे.

Ayodhya Light and Sound Show : रामललांच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी जोरदार तयारी केली जात आहे. अशातच देशभरातील नागरिकांमध्ये सोहळ्याबद्दल आनंदाचे वातावरण आहे. याशिवाय अयोध्या नगरीला रोषणाई केली जात आहे. अशातच मंदिर आणि शरयू नदीच्या तटावर होणाऱ्या लाइट अ‍ॅण्ड साउंड शो ला पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत.

लाइट अ‍ॅण्ड शो पाहण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता
अयोध्या नगरीत रामललांच्या आगमनाची तयारी केली जात आहे. पण अयोध्या नगरीत सुरू करण्यात आलेल्या लाइट अ‍ॅण्ड साउंड शो मुळे नागरिकांमध्ये सोहळ्याबद्दल अधिक उत्साह वाढला गेला आहे. दररोज संध्याकाळी अयोध्या नगरीत लाइट अ‍ॅण्ड साउंड शो च्या माध्यमातून रामायण दाखवले जाते. याशिवाय प्रभू रामांच्या भजनासह त्यांचा फोटोच्या चहूबाजूंनी रंगीत रोषणाई केल्याचेही दिसते.

लाइट अ‍ॅण्ड साउंड शो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी
अयोध्या नगरीत लाइट अ‍ॅण्ड साउंड शो पाहण्यासाठी दररोज संध्याकाळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. याशिवाय अयोध्येत आलेले पर्यटकही आवर्जुन लाइट अ‍ॅण्ड साउंड शो पाहण्यासाठी थांबतात.

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेवेळी प्रतिष्ठीत व्यक्ती राहणार उपस्थितीत
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यासाठी काही प्रतिष्ठीत व्यक्ती उपस्थिती लावणार आहेत. यामध्ये बॉलिवूड, राजकीय ते क्रिकेट क्षेत्रातील मंडळींची उपस्थिती दिसून येणार आहे. याशिवाय सात हजारांहून अधिक व्हीव्हीआयपी (VVIP) देखील सोहळ्यासाठी येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : 

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत आजपासून धार्मिक विधींना होणार सुरुवात, जाणून घ्या 16-22 जानेवारीपर्यंतच्या सोहळ्याचे वेळापत्रक

गीता प्रेसकडून रामचरितमानस 10 भाषांमध्ये मोफत डाउनलोडची सुविधा, अशी मिळवा पुस्तकाची प्रत

घरबसल्या मिळणार राम मंदिराचा प्रसाद, जाणून घ्या ऑर्डरची प्रक्रिया

PREV

Recommended Stories

इंडिगो संकटात सरकारचा मोठा निर्णय! विमान कंपन्यांना तातडीचे आदेश; तिकीट दरांची मनमानी आता थांबणार!
आज 6 डिसेंबर, याच दिवशी बाबरी पाडली, TMC MLA Humayun Kabir आज बाबरी मशिदीची करणार पायाभरणी!