FASTag येत्या 31 जानेवारीपर्यंत करा अपडेट, अन्यथा....

देशभरात जवळजवळ 98 टक्के टोल नाक्यांवर फास्टॅगच्या माध्यमातून टोल वसूल केला जातो. याशिवाय देशातील आठ कोटींहून अधिक नागरिकांनी आपल्या गाडीवर फास्टॅग लावले आहेत. फास्टॅगच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टोल वसूल केला जातो.

Chanda Mandavkar | Published : Jan 16, 2024 10:04 AM IST / Updated: Jan 16 2024, 03:37 PM IST

FASTag News : कार चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण येत्या 31 जानेवारीपर्यंत फास्टॅग अपडेट करावा. अन्यथा तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट होऊ शकतो. खरंतर 31 जानेवारीपासून केवायसीशिवाय (KYC) किंवा तुम्ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली नसल्यास तुमचा फास्टॅग ब्लॅकलिस्ट (FASTag Blacklist) होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) यासंदर्भात सर्व बँकांना निर्देश दिले आहेत.

31 जानेवारीपर्यंत अपडेट करा फास्टॅग
तुम्हाला प्रवासादरम्यान फास्टॅगमुळे समस्या येऊ नये म्हणून आजच फास्टॅग अपडेट करुन घ्या. खरंतर बँकांनी आधी जारी केलेले फास्टॅग तुम्हाला आता वापरता येणार नाहीत. येत्या 31 जानेवारीनंतर लेटेस्ट फास्टॅग अ‍ॅक्टिव्हपणे काम करणार असून आधीचे फास्टॅग ब्लॅकलिस्ट केले जाणार आहेत.

फास्टॅग अपडेट का करावा?
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) एक रिपोर्ट जारी करत खुलासा केला की, वाहनांसाठी काही फास्टॅग जारी केले आहेत. केवायसीची प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय काही फास्टॅगचे वितरण करण्यात आले. जे आरबीआयच्या नियमांच्या विरोधात आहे. यामुळेच जुने फास्टॅग ब्लॅकलिस्ट केले जात आहेत. 

याशिवाय काहीजण फास्टॅग मुद्दाम कारच्या काचेवर लावत नाहीत. कारण टोल नाक्यावर उगाचच उशिर होईल असे काही वाहन चालकांना वाटते. पण यामुळे महामार्ग आणि द्रुतगती मार्गावरुन जाणाऱ्या अन्य वाहनचालकांना काही समस्यांचा सामना करावा लागतो.

देशातील 98 टक्के टोल नाक्यांवर फास्टॅगची सुविधा
सध्या फास्टॅगची सुविधा देशातील 98 टक्के टोल नाक्यांवर उपलब्ध आहे. देशात आठ कोटींहून अधिक नागरिकांनी आपल्या वाहनांवर फास्टॅग लावले आहेत.

आणखी वाचा : 

या क्रमांकावर चुकूनही करू नका फोन, सरकारने दिलाय सावधगिरीचा इशारा

घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने अशी रद्द करा भारतीय रेल्वेची Counter Ticket

राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, ही चूक करू नका

Share this article