Land Titling Act | A to Z information | निश्चित प्रॉपर्टी कार्डसाठी महत्त्वाचा कायदा | pune | mumbai

Land Titling Act | A to Z information | निश्चित प्रॉपर्टी कार्डसाठी महत्त्वाचा कायदा | pune | mumbai

Published : Sep 13, 2026, 07:02 PM IST

जगात 80 देशात हा कायदा आहे, भारतात कोणत्याही राज्यात हा कायदा नाही, पण महाराष्ट्रात हा कायदा लवकरच लागू होणार आहे. यामुळे हा कायदा ज्यांच्या नावावर जमीन आणि फ्लॅट आहे, त्यांनी समजून घेणे आवश्यक आहे. या Land Titling Act मुळे तुमच्या प्रॉपर्टीला मोठे संरक्षण प्राप्त होणार आहे. याआधी जमीन आणि फ्लॅट यांची निश्चित मोजणी केली जाणार आहे, त्याला महसूल मंत्र्यांनी सेटलमेंट हा शब्द वापरला आहे. भारताची जमीन इंग्रजांनी दोन वेळेस मोजली, नकाशे तयार केले, आता महाराष्ट्राची तिसऱ्या वेळेस तशीच मोजली जाईल आणि सर्व मालकांना निश्चित प्रॉपर्टी कार्ड दिले जाणार आहे. यामुळे कोर्ट कचऱ्यांमध्ये सुरु असलेले न्यायालयातील वाद फक्त 10 टक्केच राहतील असा दावा, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. plans to introduce a conclusive Land Titling Act by December 2026 to replace presumptive property ownership with government-backed, guaranteed legal titles.