Video: जन्मत: हात नाहीत, उत्तमरित्या पायाने चालवते कार; केरळच्या तरुणीची प्रेरणादायी कथा

Kerala: केरळातील तिरूवनंतपुरममध्ये हातांशिवाय जन्मलेली एक 32 वर्षीय तरूणी आज उत्तम पद्धतीने गाडी चालवते. पण हात नसताना वाहन परवाना मिळाला कसा? हे कसे शक्य झाले? याच बद्दल जाणून घेऊया सविस्तर…

Car Driving Without Hands: आयुष्यात इच्छाशक्तीच्या जोरावर सर्वकाही साध्य करता येते. यावेळी कोणतीही शक्ती अडवू शकत नाही असे म्हटले जाते. हीच इच्छाशक्ती ठेवून आयुष्य जगणाऱ्या केरळातील एका तरूणीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. 32 वर्षांची जिलुमोल एम. थॉमस असे तरूणीचे नाव असून तिला जन्मत:च हात नाहीत. पण तरीही जिलुमोल आपले आयुष्य एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणे जगत आहे. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर जिलुमोल कार चालवण्यास शिकली. आता म्हणाल हात नाहीत पण कार कशी चालवते? खरंतर जिलुमोल पायांनी कार चालवते. ड्रायव्हिंगवेळी जिलुमोलचे पायच तिचे हात होतात.

वाहन परवाना मिळवणे होते कठीण
जिलुमोलला जन्मत:च हात नसल्याने वाहन परवाना मिळणे कठीणच होते. जिलुमोल पेशाने जिलुमोल फ्रीलान्स डिझाइनरचे काम करते. वाहन परवाना मिळवण्यासाठी तिला सहा वर्ष मेहनत करावी लागली. तंत्रज्ञानाच्या काही नियमांनुसार जिलुमोलला वाहन परवाना देणे शक्य नव्हते. यासाठी जिलुमोलने आधी ड्रायव्हिंग स्कूलच्या मदतीने पायाने गाडी चालवण्यास शिकून घेतले. त्यानंतर वाहन परवानासाठी जिलुमोलने अर्ज केला. सहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर जिलुमोलला तिच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी स्वत: तिला वाहन परवाना दिला.

हार मानली नाही
वाहन परवाना मिळाल्यानंतर जिलुमोल खूप आनंदित झाली. तिने म्हटले की, "मी माझ्या मार्गातील सर्वाधिक मोठा अडथळा दूर केला आहे. आता मला प्रवास करताना कोणतीही समस्या येणार नाही." 

याशिवाय “जिलुमोल ही तिरूवनंतरपुरममधील पहिलीच तरूणी असून ती पायांनी गाडी चालवण्यास शिकली आणि परवाना मिळवून दाखवला” असे केरळच्या वाहतूक विभागाने म्हटले आहे. पायांनी गाडी चालवणे सोपे नाही, पण जिलुमोलने ते करून दाखवले.

Video: जिलुमोलचा प्रेरणादायी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पाहा 

लोक खिल्ली उडवायचे
जिलुमोलला जन्मत:च हात नसल्याने घरातील मंडळी नेहमीच चिंतेत असायचे. तिला असे वाटायचे की, आयुष्यात मला काहीच करता येणार नाही. पण आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर जिलुमोलने सर्वांना चुकीचे ठरविले. जिलुमोल एक उत्तम चित्रकार देखील आहे. ती एक फ्रीलांसर डिझायनर आहे. जिलुमोल गाडी चालवताना लोक तिची खिल्ली उडवायचे. पण तिने हार मानली नाही आणि प्रगती करत राहिली.

महिलांसाठी प्रेरणा
ज्या पद्धतीने जिलुमोल आपले आयुष्य जगत आहे, ती बाब प्रत्येक महिलेसाठी प्रेरणादायी आहे. सतत दुःखाचा पाढा वाचण्याऐवजी त्यावर मात करून प्रगती करावी, हाच धडा जिलुमोलकडून शिकण्यासारखा आहे.

आणखी वाचा: 

Uttarkashi Tunnel Rescue : 17 दिवस 41 कामगार फिट राहण्यामागील सीक्रेट

ऐकावे ते नवलच! बंगळुरूमध्ये बस स्टॉप गेलं चोरीला, बांधकामासाठी 10 लाख रुपये झाला होता खर्च

मॉडर्न शेतकऱ्याचा कारनामा! महागड्या ऑडीमधून स्टाइलने येतो व रस्त्यावर विकतो ताजी भाजी

 

 

Share this article