Wagh Bakri Owner Died : वाघ बकरी चहा समूहाचे मालक पराग देसाई यांचे वयाच्या ४९व्या वर्षी निधन झाले. मॉर्निंग वॉकदरम्यान त्यांच्यावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. यानंतर ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले.
Wagh Bakri Owner Parag Desai : वाघ बकरी चहा समूहाचे मालक पराग देसाई यांचे निधन झाले आहे. वयाच्या ४९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवताना ते खाली पडले. यादरम्यान त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली होती.
यानंतर काही दिवस ते व्हेंटिलेटवर होते. रविवारी (22 ऑक्टोबर 2023) संध्याकाळी त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले. त्यांच्या निधनामुळे देसाई कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अहमदाबाद मिररने दिलेल्या वृत्तानुसार, 15 ऑक्टोबर रोजी पराग देसाई घराबाहेर असतानाच भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतःला वाचवण्याच्या प्रयत्नात देसाईंना गंभीर दुखापत झाली. घराबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाने त्यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. यानंतर तातडीने त्यांना शेल्बी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
देसाई यांना शेल्बी हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखी अंतर्गत संपूर्ण एक दिवस ठेवण्यात आले होते. पुढील उपचारांसाठी त्यांना झायडस हॉस्पिटलमध्ये (Zydus Hospital) दाखल करण्यात आले. पण रविवारी उपचारादरम्यान ब्रेन हॅमरेजमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
गुजरात काँग्रेसचे प्रमुख आणि राज्यसभेचे सदस्य शक्ती सिंह गोहिल यांनी देसाई यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटले आहे की, "खूप दु:खद बातमी आहे. वाघ बकरी चहाचे संचालक आणि मालक पराग देसाई यांचे निधन झाले. जमिनीवर पडल्यानं ब्रेन हॅमरेज झाला. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो."
पराग देसाई हे वाघ बकरी चहा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रसेश देसाई यांचे सुपुत्र होते. त्यांच्या पश्चात पत्नी विदिशा आणि मुलगी परीशा असा परिवार आहे.
आणखी वाचा
North East Express Train Accident : नॉर्थ-ईस्ट एक्सप्रेसचे 21 डबे घसरले, चौघांचा मृत्यू-70 जण जखमी
Pathankot Terrorist Attack : पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी ठार, गोळ्या झाडून केली हत्या