India's First Bullet Train Terminal: साबरमती येथे भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्थानक तयार, पाहा व्हिडीओ

Ahmedabad: अहमदाबाद येथील साबरमतीमध्ये भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्थानक तयार झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या टर्मिनलचा व्हिडीओ शेअर केला आहे.

Chanda Mandavkar | Published : Dec 8, 2023 9:59 AM IST / Updated: Dec 08 2023, 03:38 PM IST

Mumbai-Ahmedabad Bullet Train: भारतातील पहिले बुलेट ट्रेन स्थानक तयार झाले आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरूवारी (7 डिसेंबर, 2023) अहमदाबाद मधील साबरमती येथे मल्टीमॉडल ट्रांन्सपोर्ट हबमध्ये (Multi-Modal Transport Hubs) उभारण्यात आलेल्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या व्हिडीओचे अनावरण केले. अश्विनी वैष्णेव यांनी शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत दिसतेय की, बुलेट ट्रेन स्थानकाच्या उभारणीदरम्यान सांस्कृतिक वारसासह आधुनिक वास्तुकलेकडेही लक्ष दिले आहे.

साबरमतीमध्ये उभारण्यात आलेल्या बुलेट ट्रेन स्थानकामध्ये प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा मिळणार आहेत. पहिली बुलेट ट्रेन अहमदाबाद आणि मुंबई दरम्यान धावणार आहे. बुलेट ट्रेन जपानच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. जपानकडून आर्थिक आणि तांत्रिक मदत देखील मिळाली आहे. बुलेट ट्रेनच्या माध्यमातून अहमदाबाद ते मुंबई प्रवासासाठी 2 तास 7 मिनिटे कालावधी लागणार आहेत. ट्रेनचा वेग 350 किमी प्रति तास असणार आहे.

अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प
अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्प हा 508 किमी अंतराचा रेल्वेमार्ग तयार केला जात आहे. या प्रकल्पासाठी 1 लाख 8 हजार कोटी रूपयांचा खर्च होईल असा अंदाज बांधण्यात आला आहे. प्रकल्पाचा खर्च 81 टक्के जपानी सॉफ्ट लोनद्वारे 0.1 टक्का प्रतिवर्षाच्या दराने घेतले जाणार आहे. यामध्ये 15 वर्षांच्या सूट कालावधीसह 50 वर्षांचा कालावधी हा कर्जाच्या परतफेडीसाठी दिला गेला आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांनी 2017 मध्ये बुलेट ट्रेन प्रकल्प लाँच केला होता. हा प्रकल्प शिंकनसेन टेक्नॉलॉजीचे तंत्रज्ञान आणि मार्गदर्शनाखाली तयार केला जात आहे. आणखी सहा हाय स्पीड रेल्वे कॉरिडोर सुरू करण्याचे सरकारचे लक्ष्य आहे. हा कॉरिडोर दिल्ली-वाराणसी, दिल्ली-अहमदाबाद, मुंबई-नागपूर, मुंबई-हैदराबाद, चैन्नई-म्हैसूर आणि दिल्ली-अमृतसर असा आहे.

आणखी वाचा: 

Jammu-Kashmir: राजौरीमध्ये दहशतवाद्यांचे 2 साथीदार अटकेत, दारूगोळाही जप्त

Global Technology Summit 2023: राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी AIबाबतचा भारताचा दृष्टीकोन मांडला जगासमोर

Javeria Khanum : जवेरियाचा भारतीय तरुणाला लव्हेरिया! आणखी एक पाकिस्तानी तरुणी होणार भारताची सून

Share this article