बहुतांशजण आजही रेल्वेने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे स्थानकात जाऊन काउंटवरुन तिकिट काढतात. पण काउंटवरील ऑनलाइन पद्धतीने रद्द कशी करायची याबद्दल काहींना माहिती नसते. याबद्दल जाणून घेऊया अधिक....
Counter Ticket Cancellation : रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करण्यासाठी बहुतांशजण अॅडव्हान्स तिकीट (Advance Tikcet) बुकिंग करतात. यामुळे रिजर्व्हेशन मिळते. पण काहीवेळेस काही कारणास्तव तिकीट रद्द करण्याची वेळ येते. अशातच ऑनलाइन पद्धतीने काढलेली तिकीट सहज रद्द होऊ शकते. पण रेल्वे स्थानकातील काउंटवरुन काढलेली तिकीट रद्द कशी करायची असा प्रश्न पडतो.
तुम्ही रेल्वे स्थानकात जाऊन काढलेली तिकीट रद्द करू शकता. यासाठी तिकीट काउंटवर रांग लावण्याची गरज नाही. तुम्ही ऑनलाइन पद्धतीनेही घरच्याघरी काउंटर तिकीट रद्द करू शकता. लक्षात असू द्या, काउंटर तिकीट ऑनलाइन पद्धतीने रद्द करण्यासाठी तुम्ही जो मोबाइल क्रमांक दिला आहे तो व्हॅलिड (Valid Mobile Number) असणे गरजेचे आहे. जाणून घेऊया याबद्दल अधिक.
आयआरसीटीसीच्या (IRCTC) अधिकृत वेबसाइटला भेट देत तुम्ही तिकीट रद्द करू शकता. पण तिकीटाचे रिफंड मिळवण्यासाठी तुम्हाला मूळ तिकीट घेऊन रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटवरच जावे लागेल. तुमची तिकीट कंन्फर्म असल्यास ट्रेनच्या चार तास प्रवासाआधी रद्द करता येऊ शकते. याशिवाय तिकीट RAC किंवा व्हेटिंग लिस्टमध्ये (Waiting List) असल्यास प्रवासाच्या 30 मिनिट आधी रद्द करू शकता.
तिकीट रद्द करण्यासाठी पुढील गोष्टी करा फॉलो
आणखी वाचा :
राम मंदिरात VIP दर्शनाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक, ही चूक करू नका
Samsung कंपनीचे हे दोन 5G स्मार्टफोन झालेत स्वस्त, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
WhatsApp वापरताना ही चूक करणे टाळा, नाहीतर बँक खाते होईल रिकामे