भारतीय नौदलाने ईराणी जहाजाला समुद्रीचाच्यांच्या तावडीतून सोडवले, 23 पाकिस्तानी नागरिकांचीही केली सुटका

भारतीय नौदलाने अदनच्या खाडीतून समुद्रीचाच्यांच्या तावडीतून एका ईराणी जाहाजाला सोडवले आहे. याशिवाय जहाजावरील पाकिस्तानी नागरिकांच्या चालक दलाचीही सुटका केली आहे.

Indian Navy : भारतीय नौदलाने पुन्हा एकदा समुद्रीचाच्यांच्या तावडीतून एका जहाजाची सुटका केली आहे. ईराणी जहाजाच्या माध्यमातून मासेमारी केली जात होती. ईराणी जहाजाला समुद्रीचाच्यांच्या तावडीतून सोडवण्यासह भारतीय नौदलाने 23 पाकिस्तानी नागरिकांचीही सुटका केली आहे. 

जवळजवळ 12 तासांहून अधिक काळ सुरू असलेल्या ऑपरेशनदरम्यान नौसनेने आपल्या विधानात म्हटले की, आमची विशेतज्ज्ञ टीम त्या क्षेत्राचा तपास करणार आहे जेथे पुन्हा मत्सपालनसह अन्य सामान्य गोष्टी सुरक्षितरित्या केल्या जातील. खरंतर, गुरूवारी (28 मार्च) समुद्रीचाच्यांनी जहाजावर ताबा मिळवला होता.

नक्की काय घडले?
शुक्रवारी (29 मार्च) समोर आलेल्या माहितीनुसार, भारतीय नौसन्याने अदनच्या खाडीजवळ समुद्रीचाच्यांच्या हल्लाचे उत्तर दिले. यानंतर जहाजावरील 23 पाकिस्तानी नागरिकांच्या चालक दलाचीही समुद्रीचाच्यांच्या तावडीतून सुटका केली. याशिवाय जहाज 'एआय कंबर 786' वर असलेल्या समुद्रीचाच्यांनी भारतीय नौसन्याच्या कार्यवाहीनंतर आत्मसमर्पण केले.

याआधीही 5 जानेवारीला भारतीय नौसन्याने समुद्रीचाच्यांच्या तावडीतून एका जहाजाला वाचवले होते. खरंतर लाइबेरियाचा ध्वज असणाऱ्या जहाजावर समुद्रीचाच्यांनी ताबा मिळवला होता. या जहाजाला सोमालियाच्या तटावरून वाचवण्यात आले होते.

आणखी वाचा : 

NIA ने बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात दोन संशयितांचे फोटो केले जारी, 10 लाखांचे बक्षीस केले जाहीर

तामिळनाडूच्या मंदिरातील लिंबांची झाली 2.3 लाखांना विक्री, वंध्यत्वावर उपाय म्हणून प्रसिद्ध आहेत लिंबू

भारतातले सुमारे 83% तरुण बेरोजगार, वाचा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनचा अहवाल

Share this article