निलेश लंके यांनी आमदारकीचा दिला राजीनामा, नगर दक्षिणमधून लढणार लोकसभेची निवडणूक

आमदार निलेश लंके यांनी पारनेर नगर नगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर नगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत.

vivek panmand | Published : Mar 29, 2024 3:07 PM IST

आमदार निलेश लंके यांनी पारनेर नगर नगर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी शरद पवार गटाकडून तुतारी चिन्हावर नगर लोकसभा मतदारसंघातून खासदारकीची निवडणूक लढवणार आहेत. येणारी लोकसभा निवडणूक दोन लाख मतांनी निवडून येण्याचा विश्वास यावेळी आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केला आहे. 

ही निवडणूक माझ्यासाठी जीवन मरणाची आहे - 
आमदार निलेश लंके यांनी म्हटले आहे की, ही निवडणूक आम्ही सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे. आपल्यासाठी ही निवडणूक जीवन मरणाची आहे. ही निवडणूक आपल्याला कोणत्याही परिस्थिती जिंकण्याची आहे. तुमचे हॉस्पिटल चालवले पाहिजे म्हणून तुम्ही सरकारी रुग्णालयासाठी त्यांनी काही केलं नाही, असे यावेळी आमदार निलेश लंके यांनी सांगितले आहे. 

मी कायम कार्यकर्ता असणार आहे - 
पुढे बोलताना निलेश लंके यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. सर्वसामान्यांसाठी ही निवडणूक आता प्रतिष्ठेची झाली आहे. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांमुळे तुम्हाला का घाम फुटतो? मी माझ्या जनतेसाठी शिवपुत्र संभाजी हे नाटक ठेवले होते, त्याबद्दल एका पोलिसाने मत व्यक्त केल्यावर त्याला निलंबित करण्यात आले. निलेश लंके यांनी यावेळी भावुक होऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. 
आणखी वाचा - 
NIA ने बंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणात दोन संशयितांचे फोटो केले जारी, 10 लाखांचे बक्षीस केले जाहीर
तामिळनाडूच्या मंदिरातील लिंबांची झाली 2.3 लाखांना विक्री, वंध्यत्वावर उपाय म्हणून प्रसिद्ध आहेत लिंबू

Share this article