दरवेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला खासदारांची माहिती जाहीर केली जाते. यावर्षी खासदारांची संपत्ती जाहीर करण्यात आली असून खासदारांच्या संपत्तीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरवेळी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला खासदारांची माहिती जाहीर केली जाते. यावर्षी खासदारांची संपत्ती जाहीर करण्यात आली असून खासदारांच्या संपत्तीत महाराष्ट्र सातव्या क्रमांकावर असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये तेलंगणा सर्वात पुढे असून येथील चार पैकी एक खासदार अब्जाधीश श्रेणीत येत असल्याचं दिसून येत. आंध्र प्रदेशात सर्वाधिक चार खासदार हे अब्जाधीश आहेत.
तसेच तेलंगणा,महाराष्ट्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश येथे प्रत्येकी तीन खासदार हे अब्जाधीश असल्याची माहिती समजली आहे. खासदार पदाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरल्यानंतर त्यामध्ये सर्व माहिती दिलेली असते. यामध्ये उमेदवाराकडे किती गाड्या आहेत, किती संपत्ती त्याच्या नावावर आहे आणि त्याच्याकडे किती सोने आहे याबाबतची माहिती निवडणूक आयोगाकडून जाहीर केली जाते.
काही उमेदवार ही माहिती लपवत असल्याचं दिसून येत पण सर्वाधिक पैसे असणाऱ्या खासदारांमध्ये यावेकी आंध्र प्रदेश राज्याने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र यामध्ये आघाडीवर असल्याचं दिसत आहे. महाराष्ट्रामधील तीन खासदारांकडे शंभर कोटींपेक्षा जास्त म्हणजेच एक अब्ज रुपयांपेक्षा संपत्ती जास्त आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील खासदार यामध्ये आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
आणखी वाचा -
अबकारी धोरण प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
अजय देवगणमुळे सहकलाकाराच्या पत्नीने उचलले होते आत्महत्येचे पाऊल, नेमकं काय होत प्रकरण?