आईचा आशीर्वाद घेताना महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा व्हायरल झाला फोटो, लोकांनीच उमेदवाराला दिले दहा लाख रुपये

आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे एकमेकांविरुद्धच्या लढती आता होणार असल्याचे दिसून येत आहे.

vivek panmand | Published : Apr 1, 2024 8:50 AM IST

आगामी लोकसभा निवडणुकांची तयारी सुरु झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे एकमेकांविरुद्धच्या लढती आता होणार असल्याचे दिसून येत आहे. शरदचंद्र पवार गटाकडून पाच उमेदवारांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. पक्षाकडून एका शिक्षकाला लोकसभेचे तिकीट जाहीर करण्यात आले आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या विरोधात दिंडोरी येथून त्यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. भगरे गुरुजींना आता लोकवर्गणीतून प्रचारासाठी पैसे जमा केले आहेत. भगरे गुरुजींचा फोटो जितेंद्र आव्हाड यांनी व्हायरल केला आहे. गुरुजींनी आईच्या दर्शनासाठी गेल्यानंतर काढलेला फोटो जितेंद्र आव्हाड यांनी एक्स प्लॅटफॉर्मवरून व्हायरल केला आहे. 

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आईचे आशीर्वाद घेताना दिसणारी व्यक्ती आहे, ती शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून दिंडोरी लोकसभेचे उमेदवार आहेत. त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे ते भास्कर भगरे सर म्हणून शिक्षक आणि पालकांत प्रसिद्ध आहेत. सध्या ते पिंपळगाव बसमत येथील कन्या शाळेत शिक्षक आहेत. फोटो निरखून पाहिला तर त्यांच्या घरातील परिस्थिती सहज लक्षात येईल.” आता हे उमेदवार निवडून येतील का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 
आणखी वाचा - 
अबकारी धोरण प्रकरण : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी
Video : गुवाहाटी विमानतळाच्या छताचा पावसामुळे एक भाग कोसळला, प्रवाशांमध्ये उडाली खळबळ

Share this article