ज्ञानवापी मशिदीच्या व्यास तळघरात येत्या 6 फेब्रुवारी पर्यंत दररोज पूजा होणार आहे. या पूजेवर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाने या प्रकरणी पुढील सुनावणी येत्या 6 फेब्रुवारी पर्यंत स्थगित केली आहे.
Gyanvapi : ज्ञानवापी मशिदीच्या दक्षिण दिशेला असलेल्या व्यास तळघरात दररोज पूजा होणार आहे. कारण अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतजामिया मशीद कमेटीद्वारे दाखल केलेल्या याचिकेवरील सुनीवणीला येत्या 6 फेब्रुवारी पर्यंत स्थगिती दिली आहे. यामुळे व्यास तळघरात 6 फेब्रुवारी पर्यंत पूजेसाठी कोणत्याही प्रकारची बंदी नसणार आहे.
6 फेब्रुवारीला होणार पुढील सुनावणी
वाराणसी कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापी मशिदीच्या सीलबंद तळघरात 1 फेब्रुवारीला कठोर सुरक्षा व्यवस्थेत पूजा-प्रार्थना सुरू झाली आहे. या प्रकरणात अंजुमन इंतजामिया मशिदीच्या कमिटी द्वारे याचिका दाखल करण्यात आली आहे.
31 वर्षांनंतर व्यास तळघरात पुन्हा सुरू झालीय पूजा
ज्ञानवापी प्रकरणात वाराणसी कोर्टाने बुधवारी हिंदू पक्षाला व्यास तळघरात नियमित पूजा करण्यासाठी परवानगी दिली होती. व्यास तळघर ज्ञानव्यापी मशीदीच्या आतमध्ये आहे. सध्या व्यास तळघर सीलबंद करण्यात आले होते. वर्ष 1993 पर्यंत येथे हिंदू पूजा करायचे. पण आता कोर्टाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा 31 वर्षांनंतर व्यास तळघरात पूजा करण्यास सुरुवात झाली आहे.
आणखी वाचा :
Hindus Pray in Gyanvapi : ज्ञानव्यापीच्या व्यास तळघरात करण्यात आली पूजा, भाविकांनी व्यक्त केला आनंद
Delhi Liquor Scam : ईडीच्या पाचव्या समन्सलाही अरविंद केजरीवाल यांनी धुडकावले, APP पक्षाने म्हटले...