Farmers Protest : शेतकऱ्यांच्या आंदोलनाआधी दिल्ली पोलीस हाय अ‍ॅलर्टवर, हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

शेतकऱ्यांच्या 'दिल्ली चलो' आंदोलनामुळे दिल्ली पोलीस हाय अ‍ॅलर्टवर आहे. दिल्लीच्या सर्व सीमेवर कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. याशिवाय हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 11, 2024 9:16 AM IST / Updated: Feb 11 2024, 02:50 PM IST

Farmers Protest :  येत्या 13 जानेवारीला 200 हून अधिक शेतकऱ्यांच्या संघटनांनी 'दिल्ली चलो' आंदोलनाची हाक दिली आहे. याच पार्श्वभूमीवर हरियाणा पोलिसांनी वाहतूकीसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. 

हरियाणा पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलेय की, जो पर्यंत महत्त्वाचे काम नसेल तोवर मार्गदर्शक सूचनांमधील मार्गांवरुन जाणे टाळावे. याशिवाय शेतकऱ्यांच्या आंदोलनाआधी कायदा आणि सुव्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी हरियाणातील पंचकूला येथे जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली पोलीस अ‍ॅलर्टवर
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली पोलीस अ‍ॅलर्टवर आहे. दिल्लीच्या सर्व सीमांवर कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. संयुक्त किसान मोर्चा आणि किसान मजदूर मोर्चा या संघटनांनी शेतकऱ्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमत (MSP) देणारा कायदा तयार करण्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्यासाठी आंदोलनाची हाक दिली आहे.

हरियाणा आणि पंजाबमधील शेतकऱ्यांना दिल्लीच्या सीमेवर रोखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी तयारी केली आहे. सीमेवर मोठ्या क्रेन आणि कंटेनर लावण्यात आले आहेत.

हरियाणा पोलिसांनी दिला इशारा
हरियाणा पोलिसांनी इशारा दिलाय की, शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारे हरियाणा आणि पंजाब पार करून दिल्ली सीमेवर घुसण्याचा प्रयत्न केल्यास सीमा क्रेन आणि कंटेनरने सील केली जाईल. हरियाणा पोलिसांनी सल्ला देत म्हटले की, शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान नागरिकांना पंजाबचा दौरा करू नये. याशिवाय  नागरिकांनी सोशल मीडियावर आंदोलनासंबंधित माहितीचे अपडेट पाहावेत. 

शेतकरी नेते जगजीत सिंह दल्लेवांनी केलय हे विधान
शेतकरी नेते जगजीत सिंह दल्लेवाल यांनी म्हटले की, सीमा सील करण्यासह जमावबंदी लागू करण्यात आली आहे. याशिवाय इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. सरकारला इंटरनेट सेवा बंद करण्याचा अधिकार आहे का? असा सवालही जगजीत यांनी उपस्थितीत केला आहे.

आणखी वाचा : 

Uttar Pradesh : 22 वर्षांनंतर साधुच्या वेषात घरी आलेल्या मुलाची पोलखोल, आईने केला मोठा खुलासा

Budget Session : 'चला तुम्हाला शिक्षा देणार आहे', म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले भाजप, विरोधी पक्षाच्या खासदारांसोबत लंच (See Photos)

White Paper vs Black Paper : मोदी सरकारच्या 10 वर्षांच्या कामाचा लेखाजोखा मांडणारा 'ब्लॅक पेपर' काँग्रेसकडून जारी

Share this article