Temjen Imna Along : नागालँडचे मंत्री आणि भाजप नेते तेमजेन इम्रा अलाँग (Temjen Imna Along) तलावाच्या काठावर जमा झालेल्या चिखलामध्ये अडकले होते. बरीच धडपड केल्यानंतर अखेर चिखलातून बाहेर येण्यास त्यांना यश मिळाले.
Temjen Imna Along : नागालँड सरकारमधील मंत्री आणि भाजप नेते तेमजेन इम्रा अलाँग (Temjen Imna Along) आपल्या खास व हटके शैलीमुळे नेहमीच चर्चेमध्ये असतात. शनिवारी (10 फेब्रुवारी) सकाळी देखील त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील आपल्या अकाउंटवर स्वतःचाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
व्हिडीओमध्ये तेमजेन (Temjen Imna Along) तलावाच्या काठावर चिखलामध्ये अडकलेले दिसत आहेत. चिखलातून त्यांना बाहेर काढण्यासाठी तीन लोक मोठ्या प्रमाणात धडपड देखील करताहेत. अखेर बऱ्याच प्रयत्नांनंतर स्वतःची सुटका करण्यामध्ये तेमजेन यांना यश मिळाले.
चिखलातून बाहेर येण्यासाठी करावी लागली कसरत
'X' शेअर केलेल्या 4.42 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकता की चिखलामध्ये अडकलेले भाजपचे नेते तेमजेन इम्रा अलाँग (Temjen Imna Along) यांना बाहेर काढण्यासाठी तळ्यामध्ये असणारा एक व्यक्ती खूप प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे काठावर असलेले आणखी दोन व्यक्ती त्यांना मदत करत होते.
भाजपचे नेते सुद्धा स्वतःची सुटका करून घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर अखेर त्यांना चिखलातून बाहेर येण्यास यश मिळालेच. तलावातून बाहेर आल्यानंतर ते खुर्चीवर बसले आणि क्षणभर विश्रांती घेतली.
हा व्हिडीओ शेअर करण्यासोबतच तेमजेन यांनी गंमतीशीर पोस्ट देखील लिहिली आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, “आज JCBची परीक्षा होती. NOTE - हे सर्व काही NCAP (New Car Assessment Programs) रेटिंगबाबत आहे. गाडी खरेदी करण्यापूर्वी NCAP रेटिंग नक्की तपासा. कारण प्रश्न तुमच्या जीवाचा आहे.”
आणखी वाचा
PF Interest Rate : नोकरदारांसाठी सरकारची मोठी घोषणा, आता PF खात्यावर मिळणार इतके टक्के व्याज
काँग्रेसने देशाचा विकास मंदावला, आम्ही विक्रमी वेगाने केले काम - PM नरेंद्र मोदी
पाकिस्तानी लष्करप्रमुखांनी नेत्यांना पाजले ज्ञानामृत, लोकशाही यशस्वी करण्यासाठी करावे लागेल हे काम