Uttar Pradesh : 22 वर्षांनंतर साधुच्या वेषात घरी आलेल्या मुलाची पोलखोल, आईने केला मोठा खुलासा

उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये गेल्या आठवड्यात साधुच्या वेषात आलेल्या मुलाने आपणच 20 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेलो तुमचा मुलगा असल्याचे एका परिवाराला सांगितले. घरातील मंडळी बेपत्ता झालेल्या आपल्या मुलाला पुन्हा पाहिल्याने आनंदित झाले होते. 

Amethi Viral Video : उत्तर प्रदेशातील अमेठी येथे एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अमेठीतील खारूली गावात एक तरुण मुलगा साधुच्या वेषात आला होता. या मुलाने असा दावा केला होता की, तो गावातील एका परिवाराचा मुलगा असून जो 22 वर्षांपूर्वी बेपत्ता झाला होता. याशिवाय साधुच्या वेषातील मुलाने स्वत: चे नाव अरुण उर्फ पिंकू असल्याचे सांगितले होते. अरुणचे आता सत्य समोर आल्याने सर्वजण हैराण झाले आहे. खरंतर, साधुच्या वेषातील मुलगा अरुण नसून गोंडा येथे राहणारा नफीस नावाचा मुलगा होता. या प्रकरणात नफीसच्या आईने त्याची ओळख पटवली आहे.

गोंडामधील देहात कोतवाली क्षेत्रातील टिकरिया गावात राहणारी नफीसची आई जलीबुनने त्याचा फोटो पाहून त्याची ओखळ पटवली आहे. जलीबुनने म्हटले की, नफीसचे लग्न झाले असून तो घरोघरी भीक मागून अन्न खातो. एका महिन्याआधी नफीस गावात आला होता. मला तीन मुलं आहेत. सर्वजण साधुचा वेष धारण करून भीक मागतात.

नफीसच्या आईने केला मोठा खुलासा
नफीसची आई जलीबुनने म्हटले की, "त्याचा चेहरा एखाद्या परिवारातील मुलासारखा दिसत असल्याने त्यांनी आपलाच मुलगा असल्याचे मानले. पण असंच कोणी एखाद्याचे मुल होऊ शकते? नागरिक हे देखील पाहत नाही की, आपलाच मुलगा आहे की दुसऱ्याचा. मला काहीही माहिती नाही, त्याने काय सांगितले आणि काय नाही. नफीसने आपण त्या परिवाराचा मुलगा असल्याचे म्हटले असल्यास ते अत्यंत चुकीचे आहे."

नफीसची पोलखोल झाल्यानंतर झाले मोठे खुलासे
नफीसचा एक भाऊ वर्ष 2021 मध्ये मिर्झापूर येथील एका घरी गेला होता. या घरातील मुलगा काही वर्षांआधी बेपत्ता झाला होता. त्यावेळी नफीसच्या भावाने स्वत:ला बेपत्ता झालेलो मुलगा मी असल्याचे परिवाराला सांगत त्यांची फसवणूक केली होती. या घटनेमुळे असा अंदाज लावला जातोय की, हे सर्वजण आधीच कोणत्या घरातील मुल बेपत्ता झालेय याची माहिती मिळवतात. यानंतर साधुच्या वेषात त्या परिवाराकडे जातात.

काही वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला मुलगा अचानक परिवारासमोर आलेला पाहून त्यांना देखील आनंद होते. पण परिवाराची नंतर फसवणूक केली जाते. असेच काहीसे अमेठीमधील खारूली गावात झाले. साधुच्या वेषात आलेल्या नफीसने स्वत: ला 22 वर्षांआधी बेपत्ता झालेला अरुण उर्फ पिंकू असल्याचे एका परिवाराला सांगितले. यामुळे परिवाराला खरंच अरुण परत आलाय असे वाटले होते.

व्हायरल झाला होता व्हिडीओ
या प्रकरणात पोलिसांकडून अधिक तपास करण्यात येत आहे. नफीसने आणखी किती परिवाराची फसवणूक केलीय याबद्दल अधिक माहिती मिळवत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपू्र्वी अमेठीत नफीस साधुच्या वेषात आला होता. नफीसने स्वत: ला गावात राहणाऱ्या रतिपाल सिंह यांचा 22 वर्षांआधी बेपत्ता झालेला मुलगा असल्याचे सांगितले होते. साधुच्या वेषात मुलाला पाहून रतिपाल सिंह यांचा परिवार खूप भावूक झाला होता. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला होता.

आणखी वाचा : 

Haldwani Violence : 'आम्हाला जीवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला', महिला पोलीस कर्मचाऱ्याने सांगितली हिंसाचारावेळी घडलेली घटना

VIDEO : नळातून सांबार पुरवला जातोय का? बंगळुरूमधील इमारतीत गढूळ पाणी पुरवठ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर, नेटकऱ्यांनी दिल्या प्रतिक्रिया

 

 

Share this article