
नाशिकमध्ये घडलेल्या हृदयद्रावक अपघातात लहान मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य हादरलं आहे. या दुर्दैवी घटनेवर Devendra Fadnavis यांनी तीव्र दुःख व्यक्त करत कुटुंबीयांना मदतीची घोषणा केली आहे. तसेच अशा दुर्घटना टाळण्यासाठी रस्त्यांवरील धोकादायक विहिरींचे ऑडिट करण्याचे आदेश दिले आहेत. याचदरम्यान बारामती पोटनिवडणुकीबाबतही त्यांनी महत्त्वाचं वक्तव्य करत सर्व पक्षांनी एकत्र येऊन बिनविरोध निवडणूक करण्याचं आवाहन केलं आहे.