Tea Capital of India : चहाची राजधानी कोणती माहितीये? इथे चहाचे मळेच मळे... जगभरात आहे चर्चा

Published : Nov 04, 2026, 02:42 PM IST

सकाळी उठल्याउठल्या वाफाळलेला चहा पिण्याची अनेकांना सवय असते. संध्याकाळीही हातात चहाचा कप असेल तर सगळा थकवा पळून जातो. आपल्या देशात चहाला एक वेगळंच महत्त्व आहे. पण तुम्हाला माहितीये का, आपल्या देशात चहाची चक्क एक राजधानी आहे.

PREV
15
चहाची राजधानी कोणत्या शहराला म्हणतात?

चहा प्यायल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवातच होत नाही. कामाचा ताण असो, प्रवास असो किंवा मित्रांसोबतच्या गप्पा, हातात चहाचा कप असेल तर मज्जाच वेगळी असते. आपल्या देशात चहाची किती क्रेझ आहे, हे वेगळ्याने सांगायला नको. पण भारतात चहासाठी खास ओळखलं जाणारं एक शहर आहे. तिथे जिथे नजर जाईल तिथे फक्त हिरवेगार चहाचे मळेच दिसतात. हे शहर म्हणजे आसाममधील दिब्रुगड. याला 'Tea City of India' असंही म्हणतात. या शहराला चहाची राजधानी हे नाव कसं पडलं?

25
चहाची राजधानी हे नाव कसं पडलं?

आसाममधलं दिब्रुगड शहर चहाच्या मळ्यांसाठी खूप प्रसिद्ध आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेल्या या शहराच्या चारही बाजूंना हिरवेगार चहाचे मळे पसरलेले आहेत. इथलं हवामान आणि माती चहाच्या लागवडीसाठी एकदम योग्य असल्याने इथे मोठ्या प्रमाणावर चहाचे मळे विकसित झाले. या भागाच्या अर्थव्यवस्थेत चहा उद्योगाचा मोठा वाटा आहे. दिब्रुगडसोबतच जवळचे तिनसुकिया आणि शिवसागर हे भागही आसामच्या चहा उत्पादनात महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणूनच या शहराला चहाची राजधानी म्हटलं जातं.

35
आसामच्या चहाची खासियत

आसामच्या चहाचं नाव काढलं की त्याची कडक चव, मस्त रंग आणि वेगळाच सुगंध डोळ्यांसमोर येतो. इतर ठिकाणच्या चहाच्या तुलनेत आसामच्या चहाची चव थोडी जास्त कडक असते. विशेषतः दुधाच्या चहासाठी इथली चहापत्ती एकदम भारी असते. म्हणूनच देशातल्या अनेक भागात चहा बनवण्यासाठी आसामची चहापत्ती वापरली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारातही आसामच्या चहाला मोठी मागणी आहे.

45
चहाच्या लागवडीचा इतिहास

आसाममध्ये चहाच्या लागवडीला जवळपास दोन शतकांचा इतिहास आहे. ऐतिहासिक नोंदींनुसार, १८२३ मध्ये रॉबर्ट ब्रूस याने आसाममध्ये पहिल्यांदा चहाची जंगली झाडे शोधून काढली. त्यानंतर ब्रिटिश राजवटीत आसाममध्ये व्यावसायिक पातळीवर चहाच्या मळ्यांची लागवड सुरू झाली आणि हळूहळू ती अनेक भागात पसरली.

55
पर्यटकांसाठी एक खास अनुभव

दिब्रुगडची ओळख फक्त चहा उत्पादनापुरती मर्यादित नाही. इथले हिरवेगार चहाचे मळे पर्यटकांनाही भुरळ घालतात. चहाच्या मळ्यांमध्ये फिरताना चहाची पाने कशी खुडली जातात, फॅक्टरीमध्ये त्यांच्यावर कशी प्रक्रिया होते आणि आपण पितो तो चहा कसा तयार होतो, हे सगळं इथे प्रत्यक्ष पाहता येतं. निसर्गाचा आनंद लुटायचा असेल, तर या ठिकाणाला नक्की भेट द्यायला हवी.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories