Road Markings : रस्त्यावरील पांढऱ्या आणि पिवळ्या पट्ट्यांचा अर्थ माहितीये का?

Published : Nov 03, 2026, 11:24 PM IST

आपण रस्त्यावरून गाडी चालवताना अनेकदा पांढरे आणि पिवळे पट्टे पाहतो. पण आपल्यापैकी बहुतेकांना त्याचा खरा अर्थ माहीत नसतो. या साध्या दिसणाऱ्या पट्ट्यांमागे ट्रॅफिकचे खूप महत्त्वाचे नियम लपलेले आहेत, हे तुम्हाला माहितीये का?

PREV
14
रस्त्यावर पांढरे पट्टे का मारलेले असतात?

रस्त्यावरील पांढरे पट्टे एकाच दिशेने जाणाऱ्या गाड्यांची लेन वेगळी करण्यासाठी वापरतात. हायवे, शहरातील रस्ते आणि उड्डाणपुलांवर तुम्हाला हे पट्टे दिसतील. प्रत्येक गाडीने एका विशिष्ट लेनमधूनच जावे, हा यामागचा मुख्य उद्देश असतो. यामुळे गाड्या अचानक लेन बदलत नाहीत आणि ट्रॅफिक सुरळीत राहते. तसेच, गाडीने रस्त्याच्या कोणत्या मर्यादेत राहायला हवे, हेसुद्धा या पट्ट्यांमुळे समजते.

24
तुटक पांढऱ्या पट्ट्यांचा अर्थ काय?

रस्त्यावर जर पांढरे पट्टे तुटक असतील, तर तिथे थोडी जागा सोडलेली असते. असे पट्टे असतील तर ड्रायव्हर काळजीपूर्वक आपली लेन बदलू शकतो. गरज पडल्यास तुम्ही पुढच्या गाडीला ओव्हरटेकही करू शकता. पण लेन बदलताना समोरून किंवा बाजूने येणाऱ्या गाड्यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रस्ता मोकळा आणि सुरक्षित असेल तेव्हाच तुम्ही हा नियम वापरू शकता.

34
सलग पांढरे पट्टे काय सांगतात?

रस्त्यावर जर सलग पांढरा पट्टा असेल, तर तिथे लेन बदलण्याची किंवा रस्ता ओलांडण्याची परवानगी नसते. ड्रायव्हरने आपल्याच लेनमध्ये गाडी चालवणे अपेक्षित असते. तसेच, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना असलेल्या पांढऱ्या पट्ट्यांना 'एज लाईन्स' म्हणतात. रस्ता कुठे संपतो आणि कडेचा भाग कुठे सुरू होतो, हे यावरून समजते. रात्रीच्या वेळी आणि धुक्यात गाडी चालवताना याचा खूप फायदा होतो.

पिवळे पट्टे का मारलेले असतात?

रस्त्यावरील पिवळे पट्टे विरुद्ध दिशेने ये-जा करणाऱ्या गाड्यांना वेगळे करतात. म्हणजेच, एका दिशेने जाणाऱ्या आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाड्यांनी आपापल्या लेनमध्येच राहावे. टू-वे ट्रॅफिक असलेल्या रस्त्यांवर हे पट्टे खास मारलेले असतात.

जर रस्त्यावर सलग एकच पिवळा पट्टा असेल, तर तुम्ही तो ओलांडून विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये जाऊ शकत नाही. पण जर पिवळा पट्टा तुटक असेल, तर रस्ता सुरक्षित असताना तुम्ही समोरच्या ट्रॅफिकला धोका न पोहोचवता ओव्हरटेक करू शकता.

44
दोन पिवळे पट्टे असतील तर त्याचा अर्थ काय?

रस्त्यावर जर दोन सलग पिवळे पट्टे दिसले, तर तो वाहनचालकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा इशारा असतो. ड्रायव्हरने हे पट्टे ओलांडून समोरून येणाऱ्या गाड्यांच्या लेनमध्ये अजिबात जाऊ नये. इथे ओव्हरटेक करायला सक्त मनाई असते. अपघात प्रवण क्षेत्र, वळणाचे रस्ते आणि जिथे पुढचा रस्ता स्पष्ट दिसत नाही, अशा ठिकाणी हे पट्टे मारलेले असतात. हे पट्टे ओलांडल्यास समोरून येणाऱ्या गाडीसोबत भयंकर अपघात होऊ शकतो. म्हणूनच ड्रायव्हर्सनी या नियमाचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे.

India News (भारत बातम्या): Read Latest National News (नॅशनल न्यूज टुडे) in Marathi. Check trending news, current affairs today, breaking news headlines & live updates of India at Asianet Marathi News.
Read more Photos on

Recommended Stories