आयकर विभागाने खाती गोठवल्याचा काँग्रेसचा आरोप, अजय माकन यांनी पत्रकार परिषदेत भाजपवरही केला हल्लाबोल

काँग्रेस पक्षाकडून आयकर विभागासह भाजपवर काही गंभीर आरोप लावले आहेत. आयकर विभागाने काँग्रेस आणि यूथ काँग्रेसची खाती गोठवल्याचा आरोप पक्षाचे सरचिटणीस अजय माकन यांनी केला आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 16, 2024 8:47 AM IST / Updated: Feb 16 2024, 02:42 PM IST

Congress Allegation to Income Tax : काँग्रेसने शुक्रवारी (16 फेब्रुवारी) केंद्र सरकारवर आरोप लावला की, आयकर विभागाने पक्षासह यूथ काँग्रेसची खाती गोठवली आहेत. काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस अजय माकन (Ajay Maken) यांनी पत्रकार परिषदेत घेत म्हटले की, "देशातील प्रमुख विरोधी पक्षाची सर्व खाती गोठवण्यात आली आहेत. भारतातील लोकशाही पूर्णपणे संपली आहे. याशिवाय यूथ काँग्रेसची बँक खातीही गोठवण्यात आल्याचे आम्हाला कळले आहे."

काँग्रेसकडे पैशांचा तुटवडा
माकन यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की, “सध्या आमच्याकडे खर्च करण्यासाठी, वीजेचे बिल भरण्यासह आमच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नाहीत. याशिवाय फक्त भारत न्याय यात्राच नव्हे काँग्रेस पक्षाच्या सर्व राजकीय प्रक्रियांवर देखील परिणाम झाला आहे. पक्षाकडून जारी करण्यात आलेले चेक बँक घेत नसल्याचे सांगण्यात आले. आम्ही नुकतेच पैसे ऑनलाइन पद्धतीने खात्यात जमा केले होते, ते देखील गोठवण्यात आले आहेत. या खात्यात 25 कोटी रुपये होते.”

अजय माकन यांचा भाजवर हल्लाबोल
काँग्रेस सरचिटणीस अजय माकन यांनी भाजवर (BJP) हल्लाबोल करत म्हटले की, सर्वोच्च न्यायालयाने ज्या कॉर्पोरेट बॉण्ड्सचा पैसा घटनाविरोधी ठरवला तो पैसा भाजप पक्षाकडे आहे. हा पैसा भाजप खर्च करत आहे. यामुळे भाजपची खाती देखील गोठवली पाहिजेत. आयकर विभागाने ती खाती गोठवली आहेत ज्यामध्ये पैसा कार्यकर्त्यांनी दान आणि सदस्यता अभियानाच्या माध्यमातून जमा केले होते.

दरम्यान, काँग्रेस पक्षाची खाती गोठण्याआधी सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉण्डबद्दल एक मोठा निर्णय जाहीर केला होता, सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक बॉण्डचा वैधतेलाच असंवैधानिक ठरवले होते. यामुळे माहिती अधिकारांचे उल्लंन होत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने निर्णयात म्हटले होते. अशातच इलेक्टोरल बॉण्डला वैध मानले जाणार नाही असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.

आणखी वाचा : 

'मी अमित शाह बोलतोय...' माजी आमदाराला फोन करत निवडणुकीच्या तिकिटासाठी केली पैशांची मागणी, वाचा पुढे काय घडले

Sonia Gandhi Shifts To Rajya Sabha : सोनिया गांधींकडून राज्यसभेच्या उमेदवारीचा अर्ज दाखल

Farmers Protests 2.0 : मर्सिडीज कार आणि मॉडिफिकेशन केलेले ट्रॅक्टर वापरणारे शेतकरी गरीब? सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थितीत (Watch Video)

Share this article