Jharkhand Floor Test : झारखंडमध्ये चंपई सोरेन सरकारचे विधानसभेत बहुमत सिद्ध, 47 आमदारांचा मिळाला पाठिंबा

हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर चंपई सोरेन यांना विधानासभेत बहुमत सिद्ध करता आले आहे. यामुळे झारखंडमध्ये चंपई सोरेन यांचे सरकार स्थापन होणार आहे.

Chanda Mandavkar | Published : Feb 5, 2024 10:44 AM IST / Updated: Feb 05 2024, 04:18 PM IST

Jharkhand Floor Test : झारखंडचे मुख्यंमंत्री चंपई सोरेन यांना सोमवारी (5 जानेवारी) विधानसभेत बहुमत सिद्ध करता आले आहे. बहुमतासाठी चंपई सोरेन (Champai Soren) यांच्या बाजूने 47 मत पडली आणि 29 मत त्यांच्या विरोधात पडली गेली.

अपक्ष आमदार सरयू राय मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी झाले नव्हते. विधानसभेत मतदानादरम्यान 77 आमदार उपस्थितीत होते. झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागा आहेत. अशातच झारखंडमध्ये सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही एका पक्षातील 41 आमदारांची गरज असते.

मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी मानले आभार
झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांनी सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'वर विधानसभेत बहुमत सिद्ध झाल्यानंतर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये चंपई सोरेन यांनी म्हटले की, “झारखंड विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी आमच्या सरकारला दिलेल्या पाठिंब्यामुळे सर्व आमदारांचे आभार. आपल्या एकजुटीने राज्याला अस्थिर करण्याचे जे षडयंत्र होते ते मोडून काढले आहे. ”

विधानसभेत हेमंत सोरेन यांचा भाजपवर हल्लाबोल
विधानसभेला संबोधित करत माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांनी भाजपवर (BJP) आरोप लावले. हेमंत सोरेन यांनी म्हटले की, झारखंडमधील कोणत्याही आदिवासी मुख्यमंत्र्याने आपला कार्यकाळ पूर्ण करू नये असे भाजपला वाटते. याशिवाय पहिल्यांदाच देशात एखाद्या मुख्यमंत्र्याला रात्रीच्या वेळेस अटक करण्यात आले.

आठड्याभरातच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले चंपई सोरेन
झारखंडमधील राजकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) एण्ट्री केल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राजकरण तापले होते. अखेर तत्कालीन मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर आठवड्याभरातच चंपई सोरेन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले.

दरम्यान, चंपई सोरेन यांनी याआधी कॅबिनेट मंत्रीपद सांभाळले आहे. चंपई सोरेन यांची एकूण संपत्ती दोन कोटी रुपयांच्या आसपास आहे.

आणखी वाचा : 

भाजपवर आमदारांना खरेदी करण्याचा आरोप लावणे AAP पक्षाला पडले भारी, दिल्ली पोलीस थेट पोहोचली केजरीवाल यांच्या निवासस्थानी

ईडीकडून हेमंत सोरेन यांची BMW कार जप्त, दिल्ली विमानतळावरही EDची नजर

Rajya Sabha Elections 2024 : 15 राज्यातील 56 जागांवर येत्या 27 फेब्रुवारीला निवडणूक होणार, पाहा महाराष्ट्रात किती जागा

Share this article