गोबी मंचुरियनवरवरून गोव्यात गदारोळ, म्हापसा शहरात घातली बंदी

मापुसा नगरपरिषदेच्या (एमएमसी) अध्यक्षा प्रिया मिश्रा म्हणाल्या की, “अस्वच्छता आणि सिंथेटिक रंगांच्या वापरामुळे गोबी मंचुरियनवर (Gobi Manchurian) बंदी घालण्यात आली आहे."

vaidehi raje | Published : Feb 5, 2024 10:17 AM IST / Updated: Feb 05 2024, 03:55 PM IST

Gobi Manchurian Ban In Goa : इंडियन चायनीज असा फ्युजन प्रकार असलेले गोबी मंचुरियन म्हणजे लहानथोरांचा आवडीचा पदार्थ आहे. गल्लोगल्ली या मंचुरियनचे स्टॉल्स आहेत आणि रोज हजारो लोक यावर ताव मारताना दिसतात. परंतु गोव्यात मात्र या पदार्थावर आता बंदी घालण्यात आली आहे.

चिकन मंचुरियनला शाकाहारी पर्याय असलेल्या गोबी मंचुरियवर गोव्यातील मापुसा नगरपरिषदेने कृत्रिम रंग आणि स्वच्छतेच्या चिंतेमुळे बंदी घातली आहे (Gobi manchurian ban). मापुसाचे नगरसेवक तारक आरोलकर यांनी जानेवारीच्या उत्तरार्धात या डिशवर बंदी घालण्याचे सांगितल्यानंतर हा निर्णय प्रस्ताव मांडण्यात आला ज्याला कौन्सिलने त्वरीत सहमती दर्शवली आहे.

संपूर्ण भारतातला आवडीचा पदार्थ गोव्यात मात्र नावडीचा

गोबी मंचुरियन हा पदार्थ संपूर्ण भारतातील लोकांच्या आवडीचा असला गोव्याच्या जनतेला मात्र हा पदार्थ अजिबात आवडत नाही. याला कारण म्हणजे हा पदार्थ बनवताना स्वच्छतेचे पालन केले जात नाही. तसेच भडक लाल रंग यावा यासाठी त्यात अनेक विक्रेते हानिकारक कृत्रिम रंग घालतात. तसेच या पदार्थात ज्या सॉसचा वापर होतो तो सॉस सुद्धा खराब प्रतीचा वापरला जातो. काही ठिकाणी तर विक्रेत्यांनी गोबी मंचुरियन बनवताना त्यात कपडे धुण्याच्या पावडरचा वापर केल्याचे निदर्शनास आले होते.

नगरपरिषदेत झाली चर्चा

मापुसा नगरपरिषदेच्या (एमएमसी) अध्यक्षा प्रिया मिश्रा म्हणाल्या की, “अस्वच्छता आणि सिंथेटिक रंगांच्या वापरामुळे या पदार्थावर बंदी घालण्यात आली आहे. वृत्तांच्या मते, "नगरसेवकांनी यावर असे मत व्यक्त केले की गोबी मंचुरीयन बनवणारे बहुतांश विक्रेते अस्वच्छ परिस्थितीत काम करतात आणि गोबी मंचुरियन (Gobi Manchurian) बनवण्यासाठी सिंथेटिक रंगांचा वापर करतात आणि त्यामुळेच आम्ही या पदार्थाच्या या विक्रीवर बंदी घालण्यास प्रवृत्त झालो आहोत."

निकृष्ट दर्जाच्या पदार्थांचा होतो वापर

मिश्रा यांनी पुढे अशी माहिती दिली की, यापूर्वी विक्रेत्यांना गोबी मंचुरियन विकणे टाळण्यास सांगितले होते. MMC चेअरपर्सन म्हणाले की,अस्वच्छता आणि सिंथेटिक रंगांचा वापर केल्यामुळे या पदार्थाचा दर्जा घसरला आहे.अन्न आणि औषध प्रशासन (FDA) च्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, हे विक्रेते अत्यंत निकृष्ट दर्जाचे सॉस वापरतात जे आरोग्यासाठी हानिकारक मानले जातात.

त्यांनी स्पष्ट केले की, हे विक्रेते उत्तम ब्रॅण्डचा सॉस दर्शनी भागात नुसता दाखवण्यासाठी ठेवतात परंतु पदार्थ तयार करताना मात्र निकृष्ट दर्जाचा सॉस वापरतात, तसेच ते बॅटरसाठी पीठ आणि कॉर्नस्टार्चसह काही प्रकारची पावडर देखील वापरतात जेणेकरून कोबी जास्त काळ कुरकुरीत राहील.

या अधिकाऱ्याने दावा केला की, “विक्रेते चक्क बॅटरमध्ये रीठा घालतात जो कपडे धुण्यासाठी वापरला जातो. "तुम्ही रेस्टॉरंटमध्ये एका थाळीसाठी 70-100 रुपये घालवता आणि रस्त्यावर मात्र मंचुरीयन केवळ 30-40 रुपयांत का मिळत असावे हा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्याचे हे उत्तर आहे.

अर्थात गोव्यात गोबी मंचुरियनवर (Gobi Manchurian) कारवाई होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2022 मध्ये देखील अन्न व औषध प्रशासनाने (FDA) श्री दामोदर मंदिरातील वास्को सप्ताह मेळ्यादरम्यान, स्टॉल्सवर लोकप्रिय खाद्यपदार्थांची विक्री प्रतिबंधित करण्याच्या सूचना मुरगाव नगरपरिषदेला जारी केल्या होत्या.

आणखी वाचा -

कांदिवलीत चार वर्षीय चिमुकलीवर शिपायाकडून लैंगिक अत्याचार, शाळेविरोधात पालकांचे जोरदार आंदोलन सुरू

Crime : राजस्थान येथे महंताची हत्या, आश्रमात सापडला मृतदेह

काशी-मथुरा मंदिर प्रेमाने मिळाल्यास बाकी सर्व काही विसरुन जाऊ, गोविंद देव गिरी महाराजांचे मोठे विधान

 

Share this article