तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना वाढदिवसानिमित्त BJP ने दिल्या शुभेच्छा, चीनी भाषेतील पोस्टर केले व्हायरल

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त भाजपकडून स्टॅलिन यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

Chanda Mandavkar | Published : Mar 1, 2024 11:02 AM IST / Updated: Mar 01 2024, 04:40 PM IST

M. K. Stalin Birthday Post by BJP : तमिळनाडूचे मुख्यंत्री एम. के. स्टॅलिन यांचा आज (1 मार्च) वाढदिवस आहे. यानिमित्त भाजपकडून स्टॅलिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात पण निशाणाही साधला आहे. तमिळनाडूतील भाजपने आपल्या सोशल मीडियावरील अकाउंट ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टवर स्टॅलिन यांचा फोटो असून चीनच्या मंदारिना भाषेत शुभेच्छा दिल्या आहेत.

खरंतर, स्टॅलिन यांना चीनी भाषेत शुभेच्छा देण्यामागील कारण असे इस्रोच्या दुसऱ्या रॉकेलट लाँच पॅडची पायाभरणी केली होती. त्याच दिवशी राज्यातील द्रमुक सरकारमधील (DMK Government) पशुसंवर्धन मंत्री अनिता राधाकृष्णन यांनी स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देत रॉकेटवर भारताऐवजी चीनचा ध्वज लावला होता.

यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही (PM Narendra Modi) द्रमुकवर निशाणा साधला होता. पंतप्रधानांनी तमिळनाडूतील एका सभेला संबोधित करत म्हटले होते की, द्रमुक सरकार भारताचे नव्हे तर चीनचे कौतुक करत आहे. दरम्यान, पंतप्रधानांनी द्रमुक सरकारवर निशाणा साधल्यानंतर तमिळनाडूच्या सरकारने आपली चूक मान्य केली होती.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी स्टॅलिन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X'च्या माध्यमातून दिल्या आहेत.

आणखी वाचा : 

देशाच्या गृहमंत्र्यांनी CAA संदर्भात दिले संकेत, कारच्या नंबर प्लेटमुळे अमित शाहांबद्दल चर्चा (See Viral Photos)

DMK Government : इस्रोच्या जाहिरातीत द्रमुकने केली मोठी चूक, कामाचे लाटले खोटे श्रेय

India Q3 GDP : तिसऱ्या तिमाहीत जीडीपी 8.4 टक्क्यांवर, आरबीआयच्या अंदाजापेक्षाही अधिक

Share this article