रणदीप सुरजेवाला यांचे हेमा मालिनींबद्दल वादग्रस्त विधान, भाजपसह कंगना राणौतने केला काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल

काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी नुकत्याच एका जनसभेला संबोधित करताना भाजप नेत्या आणि मथुरेतील खासदार हेमा मालिनी यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. यावरुन आता भाजपसह कंगना राणौतने रणदीप सुरजेवाला यांना चांगलेच सुनावले आहे.

BJP on Randeep Surjewala :  काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांनी भाजप (BJP) नेत्या हेमा मालिनी (Hema Malini) यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केले. या विधानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यावरुनच आता भाजपसह (BJP) अभिनेत्री आणि हिमाचल प्रदेशातील मंडी येथील उमेदवार कंगना राणौतने (Kangana Ranaut) रणदीप सुरजेवाला यांच्यावर निशाणा साधला आहे.

रणदीप सुरजेवाला यांचे विधान
काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला 1 एप्रिलला हरियाणातील लोकसभेच्या जागेवरून उभे असलेल्या इंडिया आघाडीतील (INDIA Alliance) उमेदवार सुशील गुप्ता यांना पाठिंबा देण्यासाठी एका जनसभेला संबोधित करत होते. यावेळी रणदीप सुरजेवाला यांनी भाजप नेत्या आणि मथुरेतील खासदार हेमा मालिनी यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान करत म्हटले की, आपण आमदार-खासदार का होतो, कारण ते आपले म्हणणे मांडू शकतात. याशिवाय हेमा मालिनी यांच्याबद्दल वादग्रस्त विधानही सुरजेवाला यांनी केले.

हेमा मालिनी यांची प्रतिक्रिया
हेमा मालिनी यांनी रणदीप सुरजेवाला यांनी त्यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. हेमा मालिनी यांनी म्हटले की, “सुरजेवाला यांच्या विधानावरूनच कळते काँग्रेस पक्ष महिलांचा द्वेष करतो.”

कंगना रणौतने साधला निशाणा
हेमा मालिनींबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानावर अभिनेत्री आणि हिमाचलमधील मंडी लोकसभेच्या जागेवरून उभ्या असलेल्या कंगना राणौतने रणदीप सुरजेवाला यांच्यावर निशाणा साधला आहे. कंगनाने म्हटले की, “बोलणे मोहब्बतचे दुकान उघडण्याची झाली होती. पण काँग्रेस नेते आता द्वेष आणि तिस्काराचे दुकान उघडून बसले आहेत. काँग्रेस महिलांसंदर्भात किती खालच्या पातळीचा विचार करतेय हे दाखवून दिले जातेय. तुमचा पराभव होणार असल्याचे दिसत असल्याने तुमचे चारित्र्य कसेय हे दररोज दाखवत आहात.”

भाजपचा काँग्रेस नेत्यावर हल्लाबोल
रणदीप सुरजेवाला यांच्यावर हल्लाबोल करत भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय (Amit Malviya) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओखाली लिहिलेय की, “काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी हेमा मालिनी यांच्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले आहे. त्यांचे हे विधान केवळ हेमा मालिनी नव्हे सामान्य महिलांचा अपमान करणारे आहे.” याआधीही काँग्रेसच्या एका नेत्याने भाजपच्या महिला नेत्यासंदर्भात वादग्रस्त विधान केले होते. यामुळे हाच राहुल गांधी यांचा काँग्रेस पक्ष जो महिलांचा द्वेष आणि तिरस्कार करतो असेही अमित मालवीय यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा : 

प्रसिद्ध बॉक्सर विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपमध्ये केला प्रवेश, विनोद तावडेंनी परत दाखवली कमाल

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचा कॅन्सरशी लढा, लोकसभा निवडणूक प्रचारात होणार नाहीत सहभागी

तुम्ही नरेंद्र मोदींना निवडून दिले तर मटण आणि चिकन खाण्यावर येणार बंदी, डीएमकेच्या नेत्याने केलं वादग्रस्त वक्तव्य

Share this article