सध्या सोन्याच्या दाराने मोठी उच्चांकी घेतली आहे. १० ग्रॅम सोने ७०,७०० रुपयांवर गेले आहे. त्यामुळं पाढव्याच्या मुहूर्तावर खरेदीदारांची मागणी पाहता सोने ७२ हजारांवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबई : सोन्याच्या भावातील विक्रमी वाढीमुळे सोने ७० हजारांवर जाणार असे काही दिवसांपूर्वी सांगितले होते. आता ती बाब खरी ठरली असून लवकरच पाडव्याच्या मुहूर्तापर्यंत सोन्याचा भाव ७२ हजारांवर जाईल असे जाणकार सांगत आहेत.२४ कॅरेट शुद्धतेचे सोने बुधवारी प्रति १० ग्रॅम ७०,००० रुपयांच्या अभूतपूर्व पातळीवर गेले. सोन्याचे किरकोळ दर आता करांसह १० ग्रॅमसाठी ७०,७०० रुपयांवर गेले आहे.
जागतिक राजकीय घडामोडी आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हची व्याजदर कपातीचे संकेत यामुळे जागतिक पातळीवर सोन्याने उचांक गाठला आहे. त्याचे पडसाद भारतातही किमतींवर उमटले आहे. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्याने नवा उच्चांक गाठत ७० हजार रुपयांच्या पातळीजवळ पोहोचले. मुंबईच्या सराफ बाजारात २४ कॅरेट सोन्याचे घाऊक दर बुधवारी तोळ्यासाठी (१० ग्रॅम) ६९,८७० रुपयांवर गेले. मंगळवारच्या तुलनेत त्यात ७६० रुपयांची वाढ झाली. ९९.५ टक्के शुद्धतेच्या स्टँडर्ड सोन्याचा बुधवारी झव्हेरी बाजारात घाऊक दर ६९,०९० रुपयांवर स्थिरावला.आता आजचे दर पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मार्च महिना सर्वोत्तम भाव :
मुंबईच्या सराफ बाजारात १० दिवसांपूर्वी शुद्ध सोन्याचे घाऊक दर ६८,०५० रुपये प्रति १० ग्रॅम होते. या दिवसांत त्यात जवळपास दोन हजार रुपयांची वाढ झाली आहे. सरलेल्या १ मार्चला ६३,१६० रुपयांवर असलेले सोन्याचे घाऊक दर २९ मार्चपर्यंत ६८,७३० रुपयांवर म्हणजेच तब्बल ५,५७० रुपयांनी कडाडले आहेत. महिनाभराच्या काळात सोन्याने दाखवलेली ही अलिकडच्या काळातील सर्वोत्तम किंमत आहे.
आणखी वाचा :
प्रसिद्ध बॉक्सर विजेंदर सिंगने काँग्रेस सोडून भाजपमध्ये केला प्रवेश, विनोद तावडेंनी परत दाखवली कमाल
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांचा कॅन्सरशी लढा, लोकसभा निवडणूक प्रचारात होणार नाहीत सहभागी