
चंद्रशेखर बावनकुळे यांनी दुष्काळी भागात अचूक पंचनामे करून शेतकऱ्यांची सही घेण्याच्या सूचना दिल्या. ट्रिगर-1 मध्ये न आलेल्या 15 ते 20 तालुक्यांचेही सर्वेक्षण करण्याचे त्यांनी सांगितले. दुष्काळात बँका आणि पतसंस्थांनी शेतकऱ्यांकडे कर्जवसुलीसाठी जाऊ नये, अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच अवैध सावकारीवर कारवाई, दुष्काळाशी संबंधित कामांसाठी DPC निधी आणि दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा विचार असल्याचे बावनकुळे म्हणाले.