शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा मारा केल्याने AIMIM नेते असदुद्दीन ओवैसी यांचा भाजपवर हल्लाबोल, म्हणाले....

एआयएमआयएम नेते असदुद्दीन ओवैसी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीसंदर्भातील मागणी मान्य करण्यासह त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत असे असदुद्दीन ओवैसी यांनी म्हटले आहे.

Farmers Protest : गेल्या दहा दिवसांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यादरम्यान, पंजाब आणि हरियाणा येथील शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच करण्यास सुरूवात केली आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना दिल्लीत येण्यापासून अडवण्यासाठी सरकारने पूर्णपणे तयारी केली आहे. अशातच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी भाजपच्या मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. याशिवाय शेतकऱ्यांवर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबद्दलही काही प्रश्न ओवैसी यांनी उपस्थितीत केले आहेत.

AIMIM पक्षाचे ट्विट
असदुद्दीन ओवैसी यांच्या पक्षाने आपल्या सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "शेतकऱ्यांची एमएसपीची मागणी मान्य करावी आणि त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत. याशिवाय सरकारकडून शेतकऱ्यांवर अश्रुधुराचा वापर का केला जातोय?" शेतकऱ्यांना अंधत्व आणू पाहत आहात का?"

शेतकरी आंदोलकाचा मृत्यू
रविवारी (18 फेब्रुवारी) रात्री सरकारसोबत चर्चेची चौथी फेरी निष्फळ ठरल्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केले. यानंतर आंदोलन अधिक चिघळले गेले. खनौरी येथे झालेल्या हिंसाचारात एका तरुण आंदोलकाचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 12 पोलीस जखमी झाले आहेत. तरुण आंदोलकाच्या मृत्यूनंतर शेतकरी नेते सरवन सिंह पंढेर यांनी आंदोलन दोन दिवस स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दरम्यान, विरोध सुरूच राहणार  असल्याचे पंढेर यांनी म्हटले आहे.

आणखी वाचा : 

राजस्थानातून 500 ट्रॅक्टरचा ताफा घेऊन निघालेला हा शेतकरी कोण? पोलिसांनी तातडीने घेतले ताब्यात

नोए़डामध्ये आंदोलन करणाऱ्या 700 हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल, राष्ट्रीय ध्वजाच्या अपमानासह पोलिसांवर करण्यात आला जीवघेणा हल्ला

पंजाब-हरियाणातील परिस्थिती नियंत्रणाबाहेर,शेतकऱ्यांवर अश्रूधुराचा मारा

Share this article