आंदोलनाचा आज 9 वा दिवस आहे. शेतकरी आणि सरकारच्या बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही. दिल्लीकडे निघालेल्या शेतकऱ्यांनी आरपारच्या लढाईला सुरुवात केली असून ते मागे फिरायला तयार नाहीत
शेतकरी बाराशे ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीकडे निघाले आहेत. पंजाबमधील चौदा हजार शेतकरी शंभू बॉर्डरवरून देशाच्या राजधानीच्या दिशेने निघाले आहेत.
परिस्थिती हाताबाहेर चालली आहे. कारण खनौरी बॉर्डरवरून शेतकरी हरियाणामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासोबत 800 ट्रॅक्टर आहेत.
हरियाणा बॉर्डरवर शेतकऱ्यांना थांबवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्यांचा मारा चालू केला आहे. शंभू बॉर्डरवरील वातावरणही तणावपूर्ण झाले आहे.
शेतकऱ्यांनी अश्रुधुरापासून वाचण्यासाठी चेहऱ्यावर मास्क आणि इअर बड्स घातले आहेत. शेतकरी प्रत्येक संकटाशी लढण्यास तयार असल्याचे दिसून येत आहे.
आंदोलनात आतापर्यंत चार मृत्यू झाले आहेत. यामध्ये 2 शेतकरी आणि 2 पोलिसांचा समावेश आहे. केंद्रीय कृषी मंत्री अर्जुन मुंडा यांनी शेतकऱ्यांना बैठकीसाठी परत आमंत्रण दिले आहे.
पोलिसांनी शेतकऱ्यांचा सामना करण्याची पूर्ण तयारी केली आहे. शंभरपेक्षा जास्त अग्निशमन दलाच्या गाड्या आणि हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.