BJPच्या राष्ट्रीय परिषद बैठकीमध्ये सर्वसमावेशक विकासावर भर देणारे व सरकारने केलेल्या कामाची माहिती सांगणारे 'फिर एक बार, मोदी सरकार' हे प्रचारगीत लाँच करण्यात आले. PM मोदींनीही राष्ट्रीय अधिवेशनात भाजप पुन्हा सत्तेमध्ये येईल,असा विश्वास व्यक्त केला.
Lok Sabha Election 2024 : प्रगती मैदानावरील भारत मंडपम् येथे पार पडलेल्या भाजपच्या राष्ट्रीय परिषद बैठकीमध्ये 'फिर एक बार, मोदी सरकार' हे प्रचार गीत लाँच करण्यात आले. ज्याद्वारे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाने केलेल्या कामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे.
देशातील 24 विविध भाषांचा या प्रचार गीतामध्ये समावेश करण्यात आला आहे. या गाण्यातील मुख्य संदेश म्हणजे सर्वसमावेशक विकासाची थीम आहे, ज्याद्वारे मोदी सरकारने विविध क्षेत्रांमध्ये, प्रदेशांमध्ये, विविध गटांमध्ये आणि समाजातील वर्गांमध्ये भारताचा जागतिक दर्जा अधिक उंचावण्यासाठी गरीबातील गरीब लोकांपर्यंत चांगल्या सोयीसुविधा पोहोचवून उत्तम कार्य केल्याची माहिती देण्यात आली आहे.
हे गीत शेतकरी, असंघटित कामगार, महिला आणि तरुणांच्या सक्षमीकरणासाठी व देशभरामध्ये अभूतपूर्व पायाभूत सुविधा तसेच आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सरकारने केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करते. तसेच चांद्रयान-3 मोहीम आणि अयोध्येतील श्री राम मंदिराचे बांधकाम यासारख्या अतुलनीय कामगिरीचा उल्लेखही या गाण्यामध्ये करण्यात आला आहे.
‘फिर एक बार मोदी सरकार’ या मोहिमेचा शुभारंभ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जानेवारी 2024 मध्ये केला होता. सर्वसमावेशक दृष्टीकोनातून भाजपने हे प्रचार गीत लाँच करून याचा प्रसार डिजिटल पद्धतीने केला आहे. याव्यतिरिक्त पक्षाने www.ekbaarphirsemodisarkar.bjp.org वेबसाइटही लाँच केली आहे, जेथे 30 लाखांहून अधिक नागरिकांनी आगामी निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला मतदान करण्याबाबत सांगत आधीच पाठिंबा दिल्याचे वचनही दिले आहे.
नमूद केल्याप्रमाणे या गाण्यामध्ये 24 भाषांचा समावेश आहे...
1. हिंदी
2. सिंधी
3. डोगरी
4. बुंदेली
5. हरियाणवी
6. गारो
7. आसामी
8. ओरिया
9. संथाली
10. भोजपुरी
11. पंजाबी
12. गुजराती
13. तमिळ
14. काश्मिरी
15. नागा
16. संस्कृत
17. कन्नड
18. कुमाऊनी
19. बंगाली
20.मारवाडी
21. इंग्रजी
22. तेलुगू
23. मराठी
24. मल्याळम
"येणार तर मोदीच"
रविवारी दिल्लीमध्ये भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha 2024) भाजपच पुन्हा सत्तेत येणार असल्याचा विश्वास व्यक्त करत असे म्हटले की, “मला जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यामध्ये परदेशातून भेटीसाठी निमंत्रणे मिळाली आहेत. त्यांना सुद्धा माहिती आहे येणार तर मोदीच".
भाजपने 'प्रवास मंत्री' नियुक्त करून (भाजप नेते प्रभारी) त्यांना लक्ष्यित मतदारसंघांमध्ये विकास उपक्रमांचे नेतृत्व करण्याची जबाबदारी दिली आहे. यानुसार 'विकसित भारत' (Developed India) 'ज्ञान' - गरीब (poor), युवा (youth), अन्नदाता (farmers) आणि नारी (women) या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले आहे. तसेच पक्षाच्या संदेशाचा प्रसार करण्यासाठी पक्षाने पुढील शंभर दिवसांमध्ये पक्ष कार्यकर्त्यांना तळागाळापासून सुरुवात करण्याचे आवाहन केले आहे. यानुसार मोदी सरकारने केलेले काम जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यापक योजना देखील आखली आहे.
आणखी वाचा
Shri Kalki Dham Mandir : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्री कल्कि धाम मंदिराची पायाभरणी PHOTOS