राजस्थानातून 500 ट्रॅक्टरचा ताफा घेऊन निघालेला हा शेतकरी कोण? पोलिसांनी तातडीने घेतले ताब्यात

Published : Feb 21, 2024, 05:53 PM ISTUpdated : Feb 21, 2024, 06:09 PM IST
Punjab Haryana farmers protest

सार

Rampal Jat : दिल्लीला पोहोचण्यापूर्वीच रामपाल जाट शेतकरी नेत्याला राजस्थान पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी निदर्शने चालू केली आहेत. 

Rampal Jat : दिल्लीच्या दिशेने जात असताना शेतकरी नेते रामपाल जाट यांना राजस्थान पोलिसांनी (Rajsthan Police) आज (21 फेब्रुवारी) सकाळी ताब्यात घेतले. त्यांना अज्ञात स्थळी हलवण्यात आले असून त्यांच्या समर्थकांना याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. ते हजारो शेतकऱ्यांना घेऊन दिल्लीकडे कूच करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

अजमेर गावात जमले शेतकरी
शेतकरी नेते रामपाल जाट (Rampal Jat) अजमेर जिल्ह्यातील सील अराई गावात शेतकऱ्यांना दिल्लीला जाण्यासाठी एकत्र करत होते. याबद्दलची माहिती सोशल मीडियावरून पसरल्यानंतर शेतकरी गावात मोठ्या प्रमाणावर जमा झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राजस्थान पोलीस सतर्क होऊन घटनास्थळी पोहचली होती.

रामपाल जाट हे किसान महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष
शेतकरी नेते रामपाल जाट हे किसान महापंचायतचे राष्ट्रीय अध्यक्ष असून अनेक राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. ते सध्या आम आदमी पार्टीशी (Aam Admi Party) संबंधित आहेत. रामपाल जाट यांची माहिती पोलिसांना मिळाली होती. रामपाल जाट हे शेतकऱ्यांशी संबंधित प्रश्न मांडत असून त्यांनी अनेकवेळा धरणे आणि निदर्शने केली आहेत. त्यांच्या अटकेनंतर निदर्शने सुरु आहेत.

आणखी वाचा - 
नोए़डामध्ये आंदोलन करणाऱ्या 700 हून अधिक शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल, राष्ट्रीय ध्वजाच्या अपमानासह पोलिसांवर करण्यात आला जीवघेणा हल्ला
कॉटन कँडीमुळे आरोग्याला कॅन्सरचा धोका, पद्दुचेरीनंतर तमिळनाडू सरकारने घातली विक्रीवर बंदी
UP : परीक्षेच्या दबावापासून दूर राहण्यासाठी विद्यार्थ्यांकडून दहशतवाद्यांद्वारे वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांचे सेवन, उत्तर प्रदेशातील घटना

 

 

PREV

Recommended Stories

वंदे मातरम् एडिट केल्यानेच देशाची फाळणी? अमित शहांच्या विधानाने संसदेत वाद
महिला कर्मचाऱ्यांसाठी वाईट बातमी; मासिक पाळीच्या रजेला हायकोर्टाची स्थगिती