Abhijit Dipke | Gyanesh Kumar | अभिजीत दिपके: केस करा, पण लढत राहणार

Abhijit Dipke | Gyanesh Kumar | अभिजीत दिपके: केस करा, पण लढत राहणार

Published : Oct 05, 2026, 02:02 PM IST

पुण्यात MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले CJP प्रमुख अभिजीत दिपके यांनी मुंबईत CJP विरोधात दाखल झालेल्या प्रकरणांवर प्रतिक्रिया दिली. कितीही केस दाखल करा किंवा जेलमध्ये टाका, देशातील लोकशाही आणि मतदानाचा अधिकार वाचवण्यासाठी लढत राहू आणि पुन्हा रस्त्यावर उतरू, असे दिपके म्हणाले. महाराष्ट्रात जवळपास 20 लाख MPSC विद्यार्थी असून वारंवार होणाऱ्या पेपर लीकमुळे त्यांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह असल्याचे त्यांनी म्हटले. भीमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीला CJPचा पूर्ण पाठिंबा असून राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील, असेही त्यांनी सांगितले. युवकांनीच परिवर्तन घडवावे लागेल, कारण हा त्यांच्या भविष्याचा प्रश्न असल्याचे दिपके म्हणाले. निवडणूक बहिष्काराबाबत विचारलेल्या प्रश्नावर, ज्ञानेश कुमार राजीनामा देत नाहीत आणि निवडणुका निष्पक्ष होत नाहीत तोपर्यंत अशा निवडणुकांत सहभागी होण्यात अर्थ नसल्याचे दिपके यांनी म्हटले. SIR फ्रीज झाल्यानंतर भाजप प्रत्यक्षात किती जागा जिंकते हे कळेल, असा दावाही त्यांनी केला.

10:31sanjay raut | जेलमध्ये एक अतिशय सुंदर, सुविधायुक्त कोठडी होती, ती मला दिली नाही, कारण - संजय राऊत
03:01Raj Thackeray | बाळासाहेबांना न आवडणारे संजय राऊत सामनाचे संपादक कसे झाले? राज ठाकरे Sanjay Raut
10:47Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे सांगितले संजय राऊत आणि बाळासाहेबांचे किस्से Sanjay Raut
12:44Raj Thackeray | मिश्कील राज ठाकरे | बाळासाहेब हे संजय राऊत यांना का शिव्या घालायचे | Sanjay Raut
16:58Ashish Shelar मी राऊतजवळ बसेन पण दाऊदजवळ नाही Sanjay Raut
03:07Pradip Purnekar | ठाणे कँडल मार्च | बाळू दादाला न्याय द्या Thane Candle March
13:18Raj Thackreay | राज ठाकरे यांचे संपूर्ण भाषण | हास्यरेषा पुस्तक प्रकाशन
13:08Uddhav Thackeray | व्यंगचित्रकार बाळसाहेब उद्धव ठाकरे यांच्या शब्दात ऐकदा ऐका | Balasaheb Thackeray
11:46Devendra Fadanvis | आलो असतो, पण 2019 नंतर उद्धव ठाकरे यांनी फोनच केला नाही | देवेंद्र फडणवीस
05:23MPSC Paper Leak | पेपर फुटी चौकशी सुरु , तुकाराम मुंढे यांचे संकेत | Tukaram Mundhe