मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे बुधवारी एक भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत.
Madhya Pradesh Accident : मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे बुधवारी (28 फेब्रुवारी) रात्री भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 21 जण जखमी झाले आहेत. याबद्दलची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या मते, अपघात बडझर घाटाजवळ पिकअप वाहानाचे नियंत्रण सुटल्याने झाला आहे. या अपघातावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु: ख व्यक्त केले आहे.
PMO ऑफिसकडून सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. या पोस्टमध्ये लिहिलेय की, “मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे झालेला अपघात अत्यंत दु:खद आहे. माझ्या शोकाकुल कुटुंबासोबत माझ्या संवेदना आहेत. या कठीण काळात ईश्वर त्यांना शक्ती देवो. यासोबतच सर्व जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी मी प्रार्थना करतो. राज्य सरकारच्या देखरेखीखाली स्थानिक प्रशासन पीडितांना सर्वतोपरी मदत करत आहेत.”
मध्य प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनीही व्यक्त केले दु:ख
मध्य प्रदेशातील दिंडोरी येथे झालेल्या अपघतातील व्यक्ती डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमावरुन घरी परत येत होते. या अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेवर मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव (Mohan Yadav) यांनीही दु:ख व्यक्त केले आहे. याशिवाय मृतांच्या परिवाराला चार-चार लाख रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणाही केली आहे.
आणखी वाचा :