आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. जाणून घ्या कोण किती जागेवरुन लढणार याबद्दल अधिक....
Lok Sabha Elections 2024 : आम आदमी पक्ष (AAP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. आज तकच्या रिपोर्ट्सनुसार, शनिवारी (24 फेब्रुवारी) दिल्लीत दोन्ही पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सीट शेअरिंगच्या फॉर्म्युल्याची घोषणा केली आहे. यानुसार आम आदमी पक्षाला दिल्लीतील सात लोकसभा जागा तर अन्य तीन जागा काँग्रेसला दिल्या गेल्या आहेत.
दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या आप आणि काँग्रेस नेत्यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार मुकुल वासनिक यांनी म्हटले की, काँग्रेस उत्तर पूर्व, चांदनी चौक, उत्तर पश्चिममध्ये आपले उमेदवार उतरवणार आहेत. याशिवाय आपकडून नवी दिल्ली, दिल्ली पूर्व, दिल्ली पश्चिम आणि दक्षिण दिल्लीतील जागांवर आपले उमेदवार उतरवणार आहेत.
दोन्ही पक्षांमध्ये गुजरात, हरियाणा, चंदीगड आणि गोव्यातही सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला आहे. आप गुजरातमध्ये दोन जागा- भरूच आणि भावनगर येथून निवडणूक लढणार आहे. हरियाणात आप एका जागेवर आपला उमेदवार उतरवणार आहे.
काँग्रेस चंदीगड येथे एका जागेवरच निवडणूक लढणार
काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी म्हटले की, पक्ष चंदीगड येथे एका सीटवर आणि गोव्यातही काँग्रेस दोन जागांवर निवडणूक लढणार आहे.
काँग्रेस आणि समाजवादी पक्षातील सीट शेअरिंगचा फॉर्म्युला
गेल्या वर्षात डिसेंबर महिन्यात उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षामध्ये अशाच प्रकारच्या सीट शेअरिंगचा फॉर्म्युला ठरला होता. दरम्यान, दिल्लीतील लोकसभा निवडणुकीबद्दल बोलायचे झाल्यास, वर्ष 2014 आणि 2019 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीत दिल्लीतील सात लोकसभा जागांवर भाजपला विजय मिळाला होता. वर्ष 2019 मध्ये काँग्रेसने पाच जागांवर आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते.
आणखी वाचा :