29th May 2025 Live Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगटोक येथे दौरा करणार आहेत. यामुळे कठोर सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याशिवाय देशातील काही ठिकाणी तुफान पावसाने हजेरी लावल्याची स्थिती आहे. अशाच काही ताज्या आणि ठळक घडामोडींसाठी एशियानेट न्यूज मराठीचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा…

11:19 PM (IST) May 29
10:18 PM (IST) May 29
जगात अनेक सुंदर शहरं आहेत. काही उंच इमारतींसाठी तर काही स्वच्छता आणि पर्यावरणासाठी प्रसिद्ध आहेत. पण तुम्हाला माहितीये का रात्रीच्या वेळी कोणते शहरं सर्वात सुंदर दिसतात? चला जाणून घेऊया.
09:58 PM (IST) May 29
मुंबईतील पासपोर्ट कार्यालयात CBI ने लाच घेणाऱ्या कनिष्ठ अधिकारी आणि दलालाला रंगेहात पकडले. बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून देण्यासाठी लाच घेतल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून सात बनावट पासपोर्ट अर्जही जप्त करण्यात आले आहेत.
09:31 PM (IST) May 29
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अप्रत्यक्ष टोला लगावल्याने महाविकास आघाडीत तणाव निर्माण झाला आहे.
09:11 PM (IST) May 29
चालकांना हृदयविकाराचा झटका येण्याच्या घटना वाढत असून, बस प्रवासही भयावह बनत चालला आहे. आता आणखी एका घटनेत वाहन चालवतानाच चालकाचा मृत्यू झाला आहे!
09:11 PM (IST) May 29
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात नवे वळण येत असताना, तिचे मामे सासरे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गृहविभागाने मोठी कारवाई केली.
08:48 PM (IST) May 29
08:20 PM (IST) May 29
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारी २०२५ साठी वारकऱ्यांना टोल माफी, वैद्यकीय सेवा, विमा संरक्षण, रस्त्यांच्या डागडुजीसह अनेक सुविधा उपलब्ध करून देण्याची घोषणा केली आहे. वारीतील प्रत्येक वारकऱ्यासाठी समूह विमा योजना लागू केली जाणारय.
06:49 PM (IST) May 29
बंगलुरुमध्ये एका ३६ वर्षीय व्यक्तीला, ज्याच्या तीन पत्नी आणि नऊ मुले आहेत, त्याला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सोने-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त केली आहे.
06:22 PM (IST) May 29
मेवाड राजघराण्याच्या राजकुमारी पद्मजा, महाराणा प्रतापांच्या वंशज असूनही, अब्जावधींच्या मालकिन असतानाही साधे जीवन जगतात. अमेरिकेत स्थायिक असूनही, त्या मेवाडचा वारसा जगभर पोहोचवत आहेत.
05:51 PM (IST) May 29
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात वडिलांनी पत्रकार परिषद घेऊन भावनिक प्रतिक्रिया दिली आहे. फॉर्च्युनर गाडी न दिल्यास लग्न मोडण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. वैष्णवीच्या चारित्र्यावर शंका घेण्यात येत असल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.
05:23 PM (IST) May 29
04:28 PM (IST) May 29
04:09 PM (IST) May 29
मुंबईतील गुन्हेगारी जगताला हादरवणाऱ्या कारवायांसाठी प्रसिद्ध असलेले दया नायक यांना सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) पदावर बढती मिळाली आहे. ग्रामीण कर्नाटकातील सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या नायक यांनी धाडसी निर्णयांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
03:36 PM (IST) May 29
03:06 PM (IST) May 29
आईसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूर येथे घडली आहे. या प्रकारानंतर मित्राचा मृतदेह शेतात पुरला गेला.
03:02 PM (IST) May 29
02:53 PM (IST) May 29
नाना पाटेकर यांनी एस.एस. राजामौली यांचा चित्रपट नाकारला: दिग्दर्शक एस.एस. राजामौली त्यांच्या १००० कोटींच्या बजेटच्या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. या चित्रपटासाठी त्यांनी नाना पाटेकर यांना विचारणा केली होती, पण त्यांनी नकार दिला.
02:34 PM (IST) May 29
असदुद्दीन ओवैसी यांनी सौदी अरेबियात पाकिस्तानचा पर्दाफाश केला. ते म्हणाले की, भारतात २४ कोटी मुस्लिम गुण्यागोविंदाने आणि अभिमानाने राहतात.
02:14 PM (IST) May 29
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पीओकेबाबत मोठे विधान केले आहे. पीओकेमधील लोक आपलेच आहेत, असे ते म्हणाले.
01:58 PM (IST) May 29
भारतात मध्यमवर्गीय कुटुंबांची संख्या जास्त आहे. त्यामुळे कार कंपन्याही कमी बजेटच्या कार बनवण्यावर भर देतात. ७ लाखांपेक्षा कमी किमतीत मिळणाऱ्या टॉप ५ कार कोणत्या ते पाहूया.
01:54 PM (IST) May 29
ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांना इशारा दिलाय. हाके यांनी म्हटले की, जरांगे उपोषणाला बसल्यास त्याच दिवशी मुंबई ते नांदेश पायी लाँग मार्च काढेन.
01:40 PM (IST) May 29
गुहागरमधील एका पर्यटकाची लोणावळ्यामध्ये हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी दोघांना लग्नाच्या मंडपातून अटक करण्यात आली आहे.
01:16 PM (IST) May 29
सोशल मीडियावर सध्या एक विचित्र व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही जणांनी केलेल्या कृत्यांमुळे समाज कुठे चाललाय असा प्रश्न पडतोय. अशीच एक घटना सध्या चर्चेत आहे.
01:01 PM (IST) May 29
Pregnant Women Delivery on Road : जळगावात एका गर्भवती महिलेची रस्त्यावरच प्रसूती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
12:53 PM (IST) May 29
ट्रेनमध्ये प्रवास करताना एका पतीने आपल्या पत्नीच्या हाताच्या बोटांवर नेलपॉलिश लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
12:45 PM (IST) May 29
शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भारतीय शिष्टमंडळ सिएरा लिओनमध्ये दाखल झाले आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादाविरुद्ध भारताचे धोरण अधोरेखित करणे आणि द्विपक्षीय संबंध मजबूत करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे.
12:12 PM (IST) May 29
17 वर्षीय मुलीने इमारतीच्या 45 व्या मजल्यावरुन उडी मारत आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना गोरेगाव येथे घडली आहे. ही मुलगी गेल्या काही वर्षांपासून नैराश्यात असल्याची माहिती समोर आली आहे.
12:03 PM (IST) May 29
दोन भारतीय शांतीरक्षक, ब्रिगेडियर अमिताभ झा आणि हवालदार संजय सिंह यांना जागतिक शांतीरक्षण मोहिमांमधील त्यांच्या त्यागाबद्दल संयुक्त राष्ट्रांकडून मरणोत्तर डॅग हॅमरस्क्जोल्ड पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
11:13 AM (IST) May 29
महाराष्ट्रात मान्सून 12 दिवस आधी दाखल झाला आहे. यामुळे राज्यातील ठिकठिकाणी तुफान पावसाच्या सरी बरसताना दिसून येत आहेत. अशातच हवामान खात्याने काय अंदाज व्यक्त केलाय याबद्दल जाणून घेऊया.
10:02 AM (IST) May 29
अमेरिकेच्या एका संघीय न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मोठ्या प्रमाणात कर लादण्यास स्थगिती दिली आहे, ज्यामुळे त्यांच्या आर्थिक धोरणांच्या एका प्रमुख भागाला मोठा धक्का बसला आहे.
09:13 AM (IST) May 29
CM Devendra Fadnavis on Sharad Pawar : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्या कामाचे कौतूक केले आहे. याशिवाय त्यांच्याबद्दलच्या काही गोष्टीही आवडतात असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
08:40 AM (IST) May 29
इलॉन मस्क यांनी अध्यक्ष ट्रम्प यांच्या खर्च कपात कार्यबल प्रमुखपदाचा राजीनामा जाहीर केला आहे. त्यांनी ट्रम्प यांना संधी दिल्याबद्दल आभार मानले आहेत. पायउतार झाल्यानंतरही, मस्क यांनी पुष्टी केली की सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE) सुरूच राहणार आहे.
08:11 AM (IST) May 29
08:07 AM (IST) May 29
आजचे प्रेम राशिभविष्य विविध राशींसाठी रोमँटिक संबंध, कौटुंबिक संबंध आणि भावना नियंत्रणाबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन प्रदान करते. काही राशींसाठी नवीन संबंधांच्या संधी येऊ शकतात.
08:03 AM (IST) May 29
आजच्या राशिभविष्यानुसार, मेष राशीच्या लोकांसाठी दिवस महत्त्वाचा आहे, वृषभ राशीच्या लोकांचे लक्ष नवीन योजनांवर असेल आणि मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस सर्जनशील असेल.
08:03 AM (IST) May 29
6 Delicious Pakora Recipes for Monsoon : पावसाळ्यात गरमागरम पकोड्यांचा आनंद काही औरच! या ६ सोप्या आणि चविष्ट रेसिपीज वापरून तुम्ही तुमच्या नवऱ्याला किंवा कुटुंबाला खुश करू शकता.
07:50 AM (IST) May 29
डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अमेरिकन दूतावासांना विद्यार्थी (F), व्यावसायिक (M) आणि विनिमय अभ्यागत (J) व्हिसांसाठी नवीन मुलाखतींचे नियुक्त्या तात्पुरते थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
07:46 AM (IST) May 29
मुलाकडून करण्यात येणाऱ्या छळाला कंटाळून गोरेगावमधील एका 78 वर्षीय महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाच मुलाने प्रॉपर्टीच्या वादातून महिलेवर हल्ला देखील केला होता.
07:32 AM (IST) May 29
पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगटोक येथे आज दौरा करणार आहेत. यामुळे तेथे कठोर सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे. तर 11 वाजता पंतप्रधान Sikkim@50 या कार्यक्रमात सहभागी होतील.