Published : May 26, 2025, 07:25 AM ISTUpdated : May 26, 2025, 11:36 PM IST

26th May 2025 Live Updates: Pune Monsoon 2025 - पुण्यात मे महिन्यातच मान्सूनचे आगमन; ६४ वर्षांचा विक्रम मोडीत

सार

26th May 2025 Live Updates :  मुंबईत रविवारपासून जोरदार पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली आहे. आजही ढगांच्या गडगडासह पावसाच्या सरी कोसळत आहे. तर काही ठिकाणी पाणी साचल्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशाच काही ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी एशियानेट न्यूज मराठीचे लाइव्ह अपडेट्स वाचत रहा…

 Heavy Rain

11:36 PM (IST) May 26

Pune Monsoon 2025 - पुण्यात मे महिन्यातच मान्सूनचे आगमन; ६४ वर्षांचा विक्रम मोडीत

पुण्यात यंदा मे महिन्यातच मान्सूनने एन्ट्री मारली आहे, ज्यामुळे ६४ वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे. गेल्या अकरा दिवसांत शहरात विक्रमी पावसाची नोंद झाली असून, पुणेकरांना सुखद गारवा मिळाला आहे.
Read Full Story

11:17 PM (IST) May 26

"काही लोकांना वाटतं सगळ्या मुली त्यांच्यासाठी उपलब्ध..." प्राची पिसाटला प्राजक्ता दिघे आणि शिल्पा नवलकर यांचा खंबीर पाठिंबा!

मराठी अभिनेत्री प्राची पिसाटने सोशल मीडियावर सुदेश म्हशिलकर यांच्या वादग्रस्त मेसेजेसचे स्क्रीनशॉट सार्वजनिक केले आहेत. या प्रकरणी प्राजक्ता कुलकर्णी दिघे आणि शिल्पा नवलकर यांनी प्राचीला पाठिंबा दिला आहे.
Read Full Story

10:37 PM (IST) May 26

ठाण्यानंतर आता कल्याणमध्ये कोरोनाचा बळी! चार रुग्ण सापडले, नागरिकांमध्ये चिंता वाढली

कल्याण-डोंबिवलीत करोना रुग्णांची संख्या वाढते आहे. कल्याणमध्ये एका महिलेचा करोनामुळे मृत्यू झाल्याने चिंता वाढली आहे. आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Read Full Story

09:32 PM (IST) May 26

पतीच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; बारामतीत खळबळ, पतीविरोधात गुन्हा दाखल

बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे पतीच्या विवाहबाह्य संबंध आणि सततच्या त्रासाला कंटाळून २२ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पतीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Read Full Story

08:18 PM (IST) May 26

VIDEO - जेव्हा राष्ट्रध्यक्षांची पत्नी त्यांच्या कानाखाली जाळ काढते, फ्रान्स राष्ट्राध्यक्षांच्या पत्नीने त्यांचा कानशिलात लगावली

राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या व्हिएतनाम दौऱ्यात त्यांच्या पत्नी ब्रिजिट यांनी विमानाच्या दारातच त्यांच्या कानाखाली लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राष्ट्राध्यक्ष कार्यालयाने स्पष्टीकरण दिले आहे की ते मजेच्या मुडमध्ये होते.

Read Full Story

06:56 PM (IST) May 26

ऑपरेशन सिंदूर - भारताने पाकिस्तानला ३० मिनिटांत दिली होती माहिती, एस. जयशंकर यांची खासदारांच्या समितीला माहिती

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी स्पष्ट केले की 'ऑपरेशन सिंदूर' सुरू झाल्यानंतर ३० मिनिटांनी पाकिस्तानला याची माहिती देण्यात आली होती. या कारवाईत फक्त दहशतवादी छावण्यांना लक्ष्य करण्यात आले होते आणि इस्लामाबादने चर्चा सुरू केल्यानंतर युद्धबंदी झाली.
Read Full Story

06:54 PM (IST) May 26

मुंडे यांच्या खंद्या समर्थकाचा अपघाती मृत्यू, माजी आमदार आर. टी. देशमुख काळाच्या अडद्याआड

तुळजापूर ते औसा मार्गावर लातूर जिल्ह्यातील बेलकुंड उड्डाणपुलाजवळ हा अपघात घडला. त्यांच्या वाहनाचा वेग अधिक असल्याने कार थेट सुरक्षा कठडा तोडून खाली कोसळली आणि चार वेळा पलटी झाली.

Read Full Story

06:14 PM (IST) May 26

IPL 2025 MI vs PBKS - आज सोमवारचा सामना रद्द झाला तर कोणाला होईल याचा फायदा

पावसाचे आगमन झाले, तर या सामन्याचे गणितच बदलून जाऊ शकते, आणि त्या बदलाचा फटका विशेषतः मुंबई इंडियन्स संघाला बसू शकतो.

Read Full Story

05:30 PM (IST) May 26

Mumbai Rain Alert - मुंबईत रेड अलर्ट!, धोधो पावसाने केला कहर; नागरिकांसाठी हवामान विभागाचा इशारा

मुंबईत मान्सूनने जोरदार हजेरी लावली असून, शहरात पावसाचा कहर पाहायला मिळतोय. हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून, मुंबई, ठाणे आणि रायगड धोक्याच्या झोनमध्ये आहेत. १९५० नंतर हा सर्वात लवकर आलेला मान्सून आहे.
Read Full Story

05:12 PM (IST) May 26

Zero Tolerance in Action - माओवाद्यांविरुद्ध मोदी सरकारची आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

२०१४ नंतर मोदी सरकारने नक्षलवाद्यांविरुद्ध 'शून्य सहनशीलता' धोरणासह निर्णायक मोहीम सुरू केली आहे. विकास आणि सुरक्षेच्या माध्यमातून नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी करण्यात सरकारला यश मिळत आहे.
Read Full Story

04:04 PM (IST) May 26

CRPF जवानावर हेरगिरीचा आरोप, पाकिस्तानला माहिती दिल्याचा संशय

NIA च्या सोमवारी प्रसिद्ध झालेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, मोती राम जाट नावाचा हा सीआरपीएफ जवान सक्रियपणे हेरगिरीत सहभागी होता आणि २०२३ पासून पाकिस्तान गुप्तचर अधिकाऱ्यांना (PIOs) राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुप्त माहिती देत होता.

Read Full Story

03:55 PM (IST) May 26

Satara Rain News - अरारारा! पावसाचा कहर अन स्टंटबाज पठ्ठ्या, बाईक चिखलातून थेट खांद्यावर घेतली!

सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात अतिवृष्टीमुळे रस्ते बंद झाल्याने विनय घोरपडे या तरुणाने आपली बाईक खांद्यावर उचलून शेतातून नेली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, विनयच्या धाडसाचे कौतुक होत आहे. 

Read Full Story

03:51 PM (IST) May 26

75 व्या वर्षी राकेश रोशन जिममध्ये, अनुपम खेर, सुनील शेट्टी यांनी केले कौतुक

७५ वर्षीय राकेश रोशन यांनी त्यांच्या जिम रूटीनने सर्वांना प्रभावित केले आहे, ज्यामुळे बॉलिवूड स्टार्सकडून त्यांचे कौतुक होत आहे. अनुपम खेर आणि सुनील शेट्टी यांनी त्यांच्या उत्साहाला प्रमाण केला आहे.

Read Full Story

03:36 PM (IST) May 26

Maharashtra Rain Update - पुढचे 4 दिवस अत्यंत महत्त्वाचे, कुठे होणार मुसळधार पाऊस? हवामान विभागाचा इशारा!

महाराष्ट्रात मान्सूनने जोरदार प्रवेश केला असून, मुंबई, पुणेसह अनेक भागात पाऊस पडत आहे. पुढील २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. 

Read Full Story

02:30 PM (IST) May 26

Mumbai Rains भुयारी मेट्रोत पाणी शिरल्याने मुंबईकरांची धावपळ; वरळी मेट्रो स्थानकात चिखलाचा थर, सेवा ठप्प

वरळी आरे मार्गावरील मेट्रोच्या वरळी स्थानकात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वरळी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानची सेवा ठप्प झाली आहे.

Read Full Story

02:17 PM (IST) May 26

iPhone 17 Series सप्टेंबरमध्ये, Apple च्या नवीन मॉडेलबद्दल ही माहिती मिळाली

iPhone १७ सिरीज, ज्यामध्ये नवीन iPhone १७ Air चा समावेश आहे, सप्टेंबर २०२५ मध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. सर्व मॉडेल्समध्ये LTPO OLED डिस्प्ले आणि १२०Hz प्रोमोशन असण्याची शक्यता आहे, Air मध्ये अतिशय पातळ डिझाइन आहे.

Read Full Story

12:41 PM (IST) May 26

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! बारामती, दौंड, माळशिरस परिसरात जनजीवन विस्कळीत

Baramati Rain Updates : पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला गेला आहे. अशातच बारामती, दौंड, इंदापूर, माळशिरस, कान्हेरी, पंढरपूर या भागांत मुसळधार पावसामुळे अक्षरशः दाणादाण उडालीये.

Read Full Story

12:25 PM (IST) May 26

कोचीजवळ जहाज बुडाले! समुद्रात मिसळले विषारी रसायन, स्पर्शानेही होऊ शकतो मृत्यू

केरळमधील कोचीजवळ एक मालवाहू जहाज, एमएससी ईएलएसए 3 (MSC ELSA 3), 640 कंटेनर बुडाल्याची घटना घडली आहे. यामुळे समुद्रातील पाणी दुषित होण्यासह त्यामध्ये विषारी रसायन मिक्स झाले आहे. 

Read Full Story

10:31 AM (IST) May 26

नवी मुंबईत धावत्या बसमध्ये कपलचे अश्लील कृत्य! कोर्टाने सुनावली ही शिक्षा

नवी मुंबईत धावत्या बसमध्ये कपलने अश्लील कृत्य केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. याच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी कपलला अटक करत कोर्टात हजर केले. यानंतर कोर्टाने कपलला शिक्षा सुनावली आहे.

Read Full Story

10:16 AM (IST) May 26

पुण्यात अर्धवट जाळलेले सापडले तीन मृतदेह, घटनने खळबळ

पुण्यात अर्धवट जळालेले तीन मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. यामधअे दोन लहान मुलांसह एका महिलेची हत्या करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. नक्की प्रकरण काय आहे सविस्तर जाणून घेऊया.

Read Full Story

09:12 AM (IST) May 26

मुंबईत ठिकठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात, लोकल सेवा 15-20 मिनिटे उशिराने

Mumbai Rains Update : मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या गडगडाटासह ठिकठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहे. यामुळे लोकल सेवा देखील विस्कळीत झाली आहे. 

Read Full Story

09:01 AM (IST) May 26

भारताला शक्तिशाली आणि नीतिमान बनविण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र आले पाहिजे - मोहन भागवत

शेजारील राष्ट्रांकडून होणाऱ्या कुरापतींना थांबवण्यासाठी भारताने बळाचा वापर करणे आवश्यक असल्याचे मत मोहन भागवत यांनी केले आहे. याशिवाय भागवत यांनी ऑपरेशन सिंदूर आणि पहलगाम हल्ल्यावरही भाष्य केले. 

Read Full Story

08:08 AM (IST) May 26

KKR चा SRH कडून पराभव, हैदराबादचा दणदणीत विजय

KKR विरुद्ध SRH लाइव्ह अपडेट्स: प्ले-ऑफच्या शर्यतीतून हे दोन्ही संघ आधीच बाहेर पडले होते. त्यामुळे केवळ औपचारिकता म्हणून हा सामना झाला. तरीही त्यात एकमेकांवरील खुन्नस दिसून आली.

Read Full Story

08:03 AM (IST) May 26

VIDEO - दिल्ली विमानतळावर पावसाचा कहर, टर्मिनल १ चा छताचा भाग कोसळला

मुसळधार पाऊस आणि वादळामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल १ चा छताचा एक भाग कोसळला, ज्यामुळे विमानसेवा काही काळ प्रभावित झाली. दिल्ली-एनसीआरमध्ये पाणी साचणे, वाहतूक कोंडी आणि वीजपुरवठा खंडित झाला कारण मान्सून असामान्यपणे लवकर आला.

Read Full Story

07:54 AM (IST) May 26

झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयकडून ग्राहकाला मारहाण, पत्त्यावरुन झाला वाद

बेंगळुरूच्या बसवेश्वर नगरात झेप्टोचा डिलिव्हरी बॉय आणि ग्राहक यांच्यात वाद झाला. डिलिव्हरी अ‍ॅड्रेसमधील एका अंकाच्या फरकामुळे झालेल्या वादात डिलिव्हरी बॉयने ग्राहकावर हल्ला केला. 

Read Full Story

07:53 AM (IST) May 26

Monday Numerology for May 26 आज सोमवारी तुमचा दिवस कसा जाईल? अंकशास्त्र भविष्य

प्रसिद्ध ज्योतिषी चिराग दारुवाला यांच्या गणनेनुसार आजचा दिवस तुमचा कसा जाईल ते पहा. कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीसाठी दिवस चांगला आणि कोणासाठी कठीण आहे ते जाणून घ्या.

 

Read Full Story

07:51 AM (IST) May 26

Monday Finance Horoscope May 26 आज सोमवारचे आर्थिक राशिभविष्य, पैशांबाबत महत्त्वपूर्ण घडामोडी

आजच्या राशिभाविष्यानुसार, मेष राशीच्या लोकांना अपेक्षित फळ मिळणार नाही. वृषभ राशीच्या लोकांवर कामाचा ताण वाढू शकतो. मिथुन राशीच्या नोकरदारांना नवीन जबाबदारी मिळू शकते.
Read Full Story

07:47 AM (IST) May 26

Monday Love Horoscope May 26 आज सोमवारचे लव्ह राशिभविष्य, जोडीदाराबरोबर डेटला जाल

आजचे प्रेम राशिभविष्य तुमच्या प्रेम जीवनासाठी काय सांगते ते शोधा. नातेसंबंधातील टिप्स, गैरसमज आणि प्रेमळ संधींबद्दल जाणून घ्या.
Read Full Story

07:44 AM (IST) May 26

2 महिने घरात डांबून ठेवत 10 वी मधील मुलीवर अनेकवेळा बलात्कार, डोंबिवलीतील घटनेने खळबळ

Crime : महाराष्ट्रातील ठाण्यात १५ वर्षांच्या मुलीला दोन महिने बंधक बनवून तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि तिला गर्भवती करण्यात आले. कुटुंबातील एका ओळखीच्या व्यक्तीने हे घृणास्पद कृत्य केले. पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना अटक केली आहे.

Read Full Story

07:36 AM (IST) May 26

केरळ आणि मुंबईत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, IMD कडून काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. शनिवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. आता हवामान खात्याने गुजरात आणि इतर राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवली असून अनेक राज्यांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Read Full Story

07:26 AM (IST) May 26

मुंबईत मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले

 

 


More Trending News