"Article 370" ओटीटीवर प्रदर्शित होणार ! कोणत्या ओटीटीवर आणि कधी पाहता येणार, जाणून घ्या

Published : Apr 18, 2024, 07:41 PM ISTUpdated : Apr 18, 2024, 07:53 PM IST
Article 370

सार

अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला राजकीय विषयावर आधारित चित्रपट ‘आर्टिकल 370’ आता लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ज्यांना पाहता आला नव्हता, ते आता ओटीटीवर हा सिनेमा पाहू शकतील.

अभिनेत्री यामी गौतमची मुख्य भूमिका असलेला राजकीय विषयावर आधारित चित्रपट ‘आर्टिकल 370’ आता लवकरच ओटीटीवर पाहायला मिळणार आहे. दोन महिन्यांपूर्वी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट ज्यांना पाहता आला नव्हता, ते आता ओटीटीवर हा सिनेमा पाहू शकतील.

जम्मू आणि काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने पाच वर्षांपूर्वी घेतला होता. यावर आधारित असलेला हा चित्रपट 23 फेब्रुवारी रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता. आता 19 एप्रिल पासून हा चित्रपट लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

चित्रपटातील कास्टिंग :

या चित्रपटात अरुण गोविल, वैभव तत्ववादी, स्कंद ठाकूर, अश्विनी कौल, किरण करमरकर, दिव्या सेठ शाह, राज झुत्शी, सुमित कौल, राज अर्जुन, असित गोपीनाथ रेडिज, अश्विनी कुमार आणि इरावती हर्षे मायादेव अशी तगडी स्टारकास्ट होती.

20 कोटी रुपयांच्या बजेट 81 कोटी रुपयांची कमाई :

अवघ्या 20 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८१ कोटी रुपयांची कमाई केली होती. आदित्य सुहास जांभळे दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती व लेखन यामी गौतमचा पती आदित्य धर याने केलं होतं.

प्रेग्नन्सीमध्ये सिनेमाचा शूटिंग :

प्रेग्नन्सीमध्ये सिनेमाचा शूटिंग अनुभव यामीने शेअर केला होता. ती म्हणाली, पहिलं मूल नेहमीच चॅलेजिंग असतं. त्यामुळे माझ्यासाठी देखील हे मानसिकदृष्ट्या थकवा आणणारं होतं. मी तर यावर आता पुस्तक लिहू शकते. पण, जर आदित्य माझ्याबरोबर नसता तर मी हे करू शकले नसते. अशावेळी तुम्हाला काळजी घेण्याची आवश्यकता असते. मी सगळ्या डॉक्टरांचे आभार मानते. ते लपून माझ्यावर लक्ष ठेवायचे. मला चेक करायचे. गरोदरपणात काम करण्याची प्रेरणा मला माझ्या आईकडून मिळाली आहे. कारण, मी तिला प्रत्येक प्रसंगात काम करताना पाहिलेलं आहे.

आणखी वाचा :

TMKOC मधील रोशन सोढीवर कोसळला दु:खाचा डोंगर, भावानंतर आता या सदस्याला गमावले

अभिनेत्री शिल्पा शेट्टी व राज कुंद्राची 97.79 कोटी रुपयांची संपत्ती ईडीने केली जप्त; आता पर्यंत कोणत्या कारवाया जाणून घ्या

सलमान खानची हत्या करायची नव्हती...तरीही का केला गोळीबार आणि किती मिळाले पैसे? आरोपींनी केला हा मोठा खुलासा

PREV

Recommended Stories

Dhurandhar X Review : अ‍ॅक्शन पॅक्ड, मास एंटरटेनर.. 'धुरंधर' पाहून प्रेक्षक काय म्हणाले?
सुंदर कविता आणि रचना अपूर्ण राहिल्या, हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्या निधनाबद्दल केला पश्चाताप