सोशल मीडियावर एका चाहत्याने गश्मीर महाजनीला तो प्राजक्ता माळीला इंस्टाग्रामवर का फॉलो करत नाही असा प्रश्न विचारला. यावर गश्मीरने रंजक उत्तर देत, प्राजक्तालाच टॅग करून तिलाच हा प्रश्न विचारला आहे.
'या' कारणामुळे गश्मीर प्राजक्ताला करत नाही फॉलो, कारण वाचून म्हणाल तुमच्यात असं कसं झालं?
आजकाल सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असतात. गश्मीर महाजनी हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असतो. देऊळबंद चित्रपट येऊन गेल्यानंतर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली.
25
एका युजरच्या प्रश्नाने लोकांचं वेधलं लक्ष
एका युजरने यावेळी गश्मीरला एक प्रश्न विचारला होता, त्यावरून त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानं आस्क मी एनिथिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रश्न विचारा असं म्हटलं होतं.
35
काय विचारला प्रश्न?
एका चाहत्याने यावेळी प्राजक्ता माळीला प्रश्न विचारले होते. त्यानं बोलताना तू प्राजक्ताला इंस्टाग्रामवर का फॉलो करत नाहीस, तुम्ही एकत्र छान काम केलं आहे असा प्रश्न विचारला होता.
या प्रश्नाला गश्मीरने मोठ्या रंजकपणे उत्तर दिलं आहे. त्यानं प्राजक्तालाच टॅग करून तू मला फॉलो का करत नाहीस हे सांग असं म्हणून तिच्याकडे चेंडू टोलवला आहे.
55
कोणत्या चित्रपटात केलं एकत्र काम?
दोघांनी मिळून फुलवंती या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांचा हा चित्रपट सर्वांना प्रचंड आवडला होता. आता या प्रश्नावर प्राजक्ता काय उत्तर देते याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहील आहे.