अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या कडक डाएटसाठी ओळखली जाते. तिने तिच्या आहारात बदल करत नॉनव्हेज खाणे सोडले आहे आणि ती ताजे अन्न खाण्यावर, जेवणात २ तासांचे अंतर ठेवण्यावर भर देते.
प्राजक्ता माळी आधी नॉनव्हेज खायची, पण 'या' कारणामुळं तिनं सोडला मांसाहार
प्राजक्ता माळी ही अभिनेत्री माध्यमांमध्ये कायमच चर्चेत राहत असते. तिने कॉमेडीची हास्यजत्रा हा कार्यक्रम हसून हसून प्रेक्षकांची पुरेवाट लावून टाकली. ती तिच्या तब्येतीची काळजी कशी घेते हा प्रश्न सर्वांना पडत असतो.
26
प्राजक्ता डाएटमध्ये काय घेते?
प्राजक्ता एकदम कडक डाएट करत असल्याची माहिती समजली. उत्तम खाणं आणि उत्तम दिनचर्या प्राजक्ता कायम फॉलो करत आली आहे. आपण मैदा जास्त खाल्ला तर मैद्यासारखेच होऊ असं तीच स्पष्ट मत आहे.
36
ताजे अन्न खाण्यावर भर द्या
तुम्ही ताजे अन्न खाण्यावर भर द्या असं प्राजक्ता कायम सांगत असते. तुमच्या त्वचेवर ग्लो यायचा असेल तर शक्य तितके लवकर झोपून शक्य तितकं लवकर उठायचा प्रयत्न करायला हवा.
रात्री जागरण करून सुंदर दिसता येत नाही असं प्राजक्ता सांगते. नियमित व्यायाम केल्यास शरीर व्यवस्थित राहायला मदत होते अशा शब्दांमध्ये प्राजक्ताने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.
56
प्राजक्ताने डाएटमध्ये केला बदल
प्राजक्ताने गेल्या काही दिवसांपासून तिच्या डाएटमध्ये बदल केला आहे. आपल्या शरीरात नॉनव्हेज पचवायला जवळपास ७२ तास लागतात असं प्राजक्ता सांगते.
66
मी आधी नॉनव्हेज खायचे पण नंतर सोडलं
मी आधी नॉनव्हेज खायचे पण नंतर सोडलं असं यावेळी बोलताना प्राजक्ताने म्हटलं आहे. सतत काहीही खाऊ नका, आपल्या जेवणामध्ये २ तासांचा गॅप असला पाहिजे असं प्राजक्ताने म्हटलं आहे.