श्रीदेवी 'या' अभिनेत्यासोबत करणार होती लग्न, किस्सा वाचून म्हणाल जे होतं ते चांगल्यासाठीच

Published : Nov 11, 2025, 03:00 PM IST

बॉलिवूडची लेडी सुपरस्टार श्रीदेवी यांच्या आईची इच्छा होती की तिने एका मोठ्या सुपरस्टारसोबत लग्न करावे, ज्यामध्ये कमल हसन यांचे नाव समोर आले होते. श्रीदेवी आणि कमल हसन यांच्यात घट्ट मैत्री होती.

PREV
16
श्रीदेवी 'या' अभिनेत्यासोबत करणार होती लग्न, किस्सा वाचून म्हणाल जे होतं ते चांगल्यासाठीच

बॉलिवूडची लेडी सुपरस्टार म्हणून ओळखली जाणारी श्रीदेवी हिला तिच्या अभिनयामुळं ओळखलं जातं. अभिनेत्रीच्या सौंदर्याने केवळ चाहतेच नव्हे तर स्टार्सही तिच्या प्रेमात पडले होते.

26
श्रीदेवी यांच्या आईची काय होती इच्छा?

श्रीदेवी यांनी एका सुपरस्टारसोबत लग्न करावं अशी त्यांच्या आईची इच्छा होती. श्रीदेवी आणि कमल हसन यांची केमिस्ट्री चित्रपटात खूप चांगली दिसून आली. श्रीदेवी यांच्या आईलाही या दोघांच्या जोडीचं कौतुक वाटलं.

36
कमल हसन

हा सुपरस्टार दुसरा तिसरा कोण नसून कमल हसन आहे. कमल यांनी श्रीदेवी यांच्यासोबत सुपरहिट असलेला सदमा या चित्रपटात काम केलं. ०१८ मध्ये श्रीदेवी यांच्या निधनानंतर कमल हासन यांनी एक नोट लिहिली होती. त्यामध्ये त्यांनी श्रीदेवी यांना जवळची मैत्रीण म्हटलं होतं.

46
कमल हसन काय म्हणाले होते?

कमल हसन यावेळी बोलताना म्हणाले की, 'मी आणि तिची आई अनेकदा श्रीदेवीच्या लग्नाबद्दल चर्चा करायचो आणि तिची आई गंमतीने सुचवायची की मी तिच्या मुलीशी लग्न करावं. मी हसून उत्तर द्यायचो की, जर असं झालं तर श्रीदेवी आणि मी एकमेकांना इतके त्रास देऊ की मला तिला दुसऱ्याच दिवशी घरी पाठवावं लागेल.'

56
श्रीदेवी आणि कमल यांच्या डेटिंगच्या उठल्या होत्या अफवा

श्रीदेवी आणि कमल यांच्या डेटिंगच्या अफवा काही वर्षांपूर्वी उठल्या होत्या. श्रीदेवी या १३ वर्षांच्या असताना कमल यांच्यासोबत चित्रपटात काम केलं होतं.

66
अफेअरच्या चर्चा ठरल्या होत्या

या सिनेमाच्या सेटवरच त्यांची मैत्री झाली आणि ते रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जायचं. पण या चर्चा खोट्या असल्याचं अभिनेत्यानं सांगितलं आणि म्हणाले होते की, श्रीदेवी त्यांना 'सर' म्हणायच्या.

Read more Photos on

Recommended Stories