दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एका मुलाखतीत खुलासा केला आहे की ते पुन्हा सलमान खानसोबत काम करणार नाहीत. 'अंतिम' चित्रपटाच्या वेळी झालेल्या अनुभवामुळे आणि सलमानच्या सिनेमातील हस्तक्षेपामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
सलमानला 'या' मराठी अभिनेत्यानं दिली शिवी, किस्सा ऐकून तळाची आग जाईल मस्तकात
महेश मांजरेकर यांना संपूर्ण मराठी सिनेसृष्टी ओळखते. त्यांचा नवीन चित्रपट शुक्रवारी रिलीज होणार आहे. त्याचबरोबर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. महेश मांजरेकर आणि सलमान खान यांची चांगली मैत्री होती.
25
सलमानसोबत दुसरा चित्रपट करणार नाही
एका मुलाखतीमध्ये महेश मांजरेकर यांनी बोलताना ते आता सलमानसोबत दुसरा सिनेमा करणार नाहीत. सलमान खानचा अंतिम नावाचा सिनेमा केला. मग तुम्ही मला विचाराल की, सलमान खानचा दुसरा सिनेमा करशील का?
35
सलमानला वाटत त्याला सिनेमा कळतो
मी ताक पण फुंकून येईल. सलमानला वाटतं, त्याला सिनेमा कळतो. त्याचे वडील मेकर आहेत. पण मी थोडासा हेड स्ट्राँग आहे. त्याच्यासाठीच तो तीन वाजता आला ना, तेव्हा मी त्याच्यावर चिडलो होतो.
तुम्ही मला शिवी दिली असं सलमान महेश यांना म्हणाला. मी त्याला म्हटलं, सलमान मी तुला शिव्या देत नाहीये. तुझ्यामध्ये जो दिग्दर्शक लपला आहे ना, त्याला शिव्या देतोय. तू आता दिग्दर्शक म्हणून पिक्चर मला दिलायस ना, मग इतर गोष्टी विसर.'
55
सलमान माणूस म्हणून खूप चांगला आहे
सलमान माणूस म्हणून खूप चांगला आहे असं महेश मांजरेकर म्हणाले. त्यांनी पुढं बोलताना म्हटलं आहे की, 'पण तो माणूस म्हणून खूप चांगला आहे. त्याच्याकडे कधीही जा, तो कधी मला नाही म्हणत नाही. मी त्याला बोलावलं एखाद्या कार्यक्रमाला, तर तो येतो. तो माणूस म्हणून ग्रेट आहे.'