अभिनेत्री करिश्मा तन्नाने दिवाळीत फटाक्यांच्या आवाजामुळे आणि प्रदूषणामुळे झालेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तिने फटाक्यांऐवजी दिवे लावून शांततेत सण साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
सकाळी ६ वाजता जाग आली... 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीनं असं वक्तव्य का केलं?
राज्यभरात दिवाळीचा उत्साह मोठ्या प्रमाणावर दिसून आला. यावेळी अनेकांनी आपल्या मित्रमंडळींसोबत आनंद साजरा केलेला दिसून आला. यावेळी अनेकांनी फटाके फोडले असून त्यामुळं प्रदूषण झाल्याचा दावा अनेकांनी केला आहे.
26
फटाक्यांच्या आवाजामुळं झाला त्रास
अनेकांनी यावेळी फटाक्यांच्या आवाजामुळे त्रास झाल्याचं सोशल मीडियावर म्हटलं होतं. त्यांनी याबद्दल तक्रारी केल्याचं दिसून आलं. दोन दिवसांपूर्वी शाहिद कपूरच्या बायकोने प्रदूषणाबद्दल एक पोस्ट केली होती.
36
अभिनेत्री करिश्मा तन्ना काय म्हणाली?
यावेळी बोलताना अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तिने म्हटलं आहे की, सकाळी ६ वाजता फटाक्यांच्या आवाजामुळे मला जाग आली. अशावेळी अनेक लोक आनंद साजरे करत होते.
आसपासची हवा प्रदूषित झाली आहे. अनेक पाळीव प्राणी हा आवाज ऐकून घाबरून लपून बसत आहेत. आपण यावेळी खरंच सण साजरे करत आहोत का? यावेळी खरच हा आनंद आहे?
56
आपण आपल्या मुलांना हे शिकवतोय का?
आपण आपल्या मुलांना आनंद म्हणजे मोठा आवाज, धूर आणि फटाके वाजवणे हे म्हणजे आनंद आहे असं आपण शिकवत आहोत का? मुक्या जीवांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या आणि सर्वत्र धूर पसरवणाऱ्या फटाक्यांपेक्षा दिवे लावून आनंद साजरा करायला हवा.
66
आपण अशी पिढी बनवूयात
आपण अशी पिढी बनवूयातज्या पिढीसाठी सण साजरा करण्याचा आनंद म्हणजे प्रकाश आणि शांतता पसरवणे आहे, ना कि प्रदूषण करणे. ही पोस्ट उशिराने पोस्ट केली पण काय करू फटाके वाजवणे थांबत नाही.