अभिनेत्री मलायका अरोरा अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचा एका मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला असून, हा व्यक्ती हिरे व्यापारी हर्ष मेहता असल्याचे म्हटले जात आहे.
मलायका अरोरा ही कायमच माध्यमांच्या चर्चेत राहणारा चेहरा आहे. कधी अर्जुन कपूर तर कधी तिच्या फिटनेमुळे ती कायमच माध्यमांमध्ये झळकताना दिसून येते. आता ती परत एकदा चर्चेत आली आहे.
26
तिच्या अदा पाहून प्रेक्षक होतात घायाळ
मलायकाच्या अदा पाहून अनेकदा प्रेक्षक घायाळ होत असल्याचं दिसून आलं आहे. यावेळी तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून यामध्ये एक मिस्ट्री मॅन तिच्यासोबत दिसून आला आहे. तो कोण आहे तेच आपण जाणून घेऊयात.
36
मिस्ट्री मॅन कोण?
मीडिया रिपोर्टनुसार, मलायका अरोरासोबत दिसलेला 'मिस्ट्री मॅन' 33 वर्षांचा आहे. हा 'मिस्ट्री मॅन' हिरे व्यापारी असून त्याचं नाव हर्ष मेहता (Harsh Mehta) असं आहे. हर्ष मेहता मलायकापेक्षा तब्बल 19 वर्षांनी लहान आहे.
हर्ष हा डायमंडचा बिझनेस करत असल्याची माहिती समजली आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघे एकत्र असून एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत. त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल अजून कोणतंही वक्तव्य केलेलं नाही.
56
दोघांनी नात्याबद्दल दिली नाही माहिती
दोघांनी अजूनही नात्याबद्दल कोणतीही माहिती दिली नाही. सोशल मीडियावर दोघांचे फोटो आणि व्हिडीओ फिरत असल्यामुळे चर्चा सुरु झाल्या आहेत.
66
मलायका आणि अर्जुन कपूर दोघांचा झाला घटस्फोट
मलायका आणि अर्जुन दोघांचं नातं खूप वर्ष चाललं होतं पण नंतर ते वेगळे झाले. मीडिया रिपोर्टनुसार, ब्रेकअपनंतर मलायकानं स्वतःला कामात व्यस्त ठेवलं. मलायका आणि हर्ष या दोघांची मैत्री एका हायप्रोफाईल पार्टीमध्ये झाली होती.