तुझ्या घरी असं काही घडलं तर? पंकज धीर यांच्या शोकसभेत जॅकी श्रॉफ यांनी 'या' प्रसिद्ध व्यक्तीला खडसावलं

Published : Oct 18, 2025, 10:28 AM IST

ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यविधीला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. यावेळी, एका फोटोग्राफरच्या वागण्यामुळे अभिनेते जॅकी श्रॉफ संतापले आणि त्यांनी त्याला खडसावले. 

PREV
16
तुझ्या घरी असं काही घडलं तर? पंकज धीर यांच्या शोकसभेत जॅकी श्रॉफ यांनी 'या' प्रसिद्ध व्यक्तीला खडसावलं

जेष्ठ अभिनेते पंकज धीर यांचे निधन झाल्यानंतर सर्व सेलिब्रेटींनी अंत्यविधीला हजेरी लावली. धीर कुटुंबाला आधार द्यायला यावेळी सर्वजण हजर होते. यावेकी जॅकी श्रॉफ यांचे फोटोग्राफरसोबतचे संभाषण व्हायरल झालं.

26
जॅकी यांनी फोटोग्राफरला खडसावले

जॅकी यांनी यावेळी फोटोग्राफरला चांगलेच खडसावले. एक फोटोग्राफर खूप जवळ आल्यावर जॅकी यांनी 'तू शहाणा आहेस ना? तुझ्या घरी असं काही घडलं तर?' सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

36
अनेकांनी जॅकी यांच्यावर केली टीका

यावेळी अनेकांनी जॅकी यांच्यावर टीका केली आहे तर काहींनी त्यांचं कौतुक केलं. इंडस्ट्रीमध्ये पंकज धीर यांचा मित्रपरिवार खूप मोठा होता. जवळच्या मित्राच्या निधनानंतर ही मंडळी अखेरचा निरोप देण्यासाठीही उपस्थित होती.

46
शोकसभेला कोण होतं उपस्थित

यावेळी शोकसभेला रोहित शेट्टी, शरद सक्सेना, सुरेश ओबेरॉय, ईशा देओल, झायेद खान, तन्वी आझमी, मोहित रैना, आदित्य पंचोली, मुकेश ऋषी, पुनीत इस्सर, अशोक पंडित, मुकेश खन्ना, जॉनी लिव्हर, रमेश तौराणी, रणजीत, रजत बेदी असे अनेक दिग्गज कलाकार उपस्थित होते.

56
पंकज यांच्या कामाबद्दल घ्या जाणून

पंकज धीर यांनी महाभारतात केलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणावर कौतुक केलं होत. त्यांनी केलेल्या कर्णाच्या कामामुळे ते प्रचंड लोकप्रिय झाले. 36 वर्षांनंतरही ही भूमिका चाहत्यांच्या लक्षात आहे.

66
पंकज यांनी कोणत्या चित्रपटांमध्ये काम केलं?

पंकज यांनी 'सनम बेवफा', 'तुमको ना भूल पायेंगे', 'सोल्जर', 'अंदाज', 'बादशाह', 'जमीन' अशा लोकप्रिय सिनेमांमध्येही त्यांनी काम केले आहे. त्यांनी केलेल्या भूमिकांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं.

Read more Photos on

Recommended Stories