अभिनेत्री मलाईका अरोरा तिच्या नवीन गाण्यामुळे चर्चेत आहे. मात्र, तिचा मुलगा अरहान खानला तिचा डान्स आवडत नाही, असे तिने स्वतः उघड केले आहे. अरहान स्वतः एक उत्तम डान्सर असून, 'आई, तू असा डान्स करू शकत नाहीस' असे म्हणत तो तिची खिल्ली उडवतो.
आई, तू असा डान्स करू शकत नाहीत; मलाईका अरोराच्या मुलाने आईची ओढली टांग
बॉलिवूडची ग्लॅमरस क्वीन मलाईका अरोरा परत एकदा चर्चेत आली आहे. ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चांमध्ये आली असून तिच्या गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. प्रेक्षकांना हे गाणे प्रचंड आवडलं आहे.
26
मुलाला आवडत नाही डान्स
आपल्या मुलाला डान्स आवडत नसल्याची कबुली खुद्द मलाईका अरोराने दिली आहे. तिने बोलताना सांगितलं की, आपल्या मुलाला आपला डान्स करणे अजिबात आवडत नाही. या खुलाशामुळे सोशल मीडियावर वाद प्रतिवाद सुरु झाले आहेत.
36
मुलगा अरहान खान आहे डान्सर
मुलगा अरहान बद्दल बोलताना मलाईका यावेळी भावुक झाली होती. तिने म्हटले की, “अरहान एक जबरदस्त डान्सर आहे. देवाचे आभार मानते की त्याच्यात माझे डान्सिंग जीन्स आहेत. तो खूप मस्त डान्स करतो.”
पुढं बोलताना मलाईकाने मन मोकळं केल्याचं दिसून आलं. तिने म्हटलं की, अरहानला तिचं प्रसिद्ध गाणं 'मुन्नी बदनाम हुई' खूप आवडतं. त्या गाण्यावरच तो वारंवार नवीन डान्स स्टेप्स शिकतो. 'चल आई, आपण एकत्र नाचू या' असं म्हणत तो मलाईकासोबत नाचतो. पण नंतर तो दिवसभर तिच्या डान्स स्टाईलची खिल्ली उडवतो.
56
आई तू असा डान्स करू शकत नाहीस म्हणून उडवतो खिल्ली
'आई, तू असा डान्स करू शकत नाहीत' अशा शब्दांमध्ये अरहान मलाईकाची खिल्ली उडवत असतो. त्याच आणि आईच बॉण्डिंग चांगलं असून अरहान हा भविष्यात चांगला डान्सर होईल अशी आशा त्याच्या आईला वाटते.
66
मलाईकाचा डान्स आला चर्चेत
मलाईका अरोराचा डान्स व्हायरल झाला आहे. यावेळी बोलताना मलाईका म्हणाली की, सुमारे एक वर्षानंतर मला पुन्हा अशा आयटम साँगवर नाचायला मिळालं. या गाण्याची कोरिओग्राफी, मूव्ह्ज आणि एक्सप्रेशन कमालीचे आहेत. मला हा परफॉर्मन्स थरारक आणि सुंदर बनवायचा होता.”