सुनील शेट्टीनं जावई आणि मुलासोबत 'हा' बिझनेस केला सुरु, प्रोडक्ट पाहून म्हणाल अण्णा तुलाच जमलं!

Published : Nov 04, 2025, 08:00 PM IST

सुनील शेट्टीने त्याचा मुलगा अहान शेट्टी आणि जावई के.एल. राहुल यांच्यासोबत EXELmoto या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रँडमध्ये गुंतवणूक केली आहे. या कंपनीने 'स्कूट' नावाची एक नवीन इलेक्ट्रिक सायकल लाँच केली आहे.

PREV
16
सुनील शेट्टीनं जावई आणि मुलासोबत 'हा' बिझनेस केला सुरु, प्रोडक्ट म्हणाल अण्णा तुलाच जमलं!

सुनील शेट्टी हा त्याच्या व्यावसायिक गुंतवणुकीसाठी ओळखला जातो. त्यानं व्यावसायिक जगतात एक नवीन पॉल टाकून स्वतःची ओळख तयार केली.

26
अण्णाने कशात गुंतवणूक केली?

सुनील शेट्टीनं त्याचा मुलगा अहान शेट्टी आणि जावई राहुलसोबत EXELmoto मध्ये गुंतवणूक केली आहे. सुनील शेट्टीनं ज्यामध्ये गुंतवणूक केलीय, ती नव्या तंत्रज्ञानावर आधारित इलेक्ट्रिक मोबिलिटी बैंड एक्सेलमोटोमध्ये गुंतवणूक केली आहे.

36
नवीन 'ही' गोष्ट केली लॉंच

सुनील शेट्टीने गुंतवणूक केलेल्या कंपनीने 'स्कूट' नावाची नवी इलेक्ट्रिक सायकल लाँच केली. डिस्कव्हरी इंडिया लिमिटेडसोबत भागीदारी केल्यानंतर व्यावसायिक विभागाने हा निर्णय घेतला आहे.

46
सुनील शेट्टी काय म्हणाला?

यावेळी बोलताना सुनील शेट्टीने आपलं मत व्यक्त केलं आहे. तो म्हणतो की, "ही संधी माझ्यासाठी वैयक्तिकरित्या खूप मोठी होती, पण त्याहूनही अधिक म्हणजे, आपल्या देशाला स्वच्छ, स्मार्ट आणि अधिक शाश्वत बनवणाऱ्या या बदलाचा भाग असणं. प्रत्येकजण हेच करण्याचा प्रयत्न करतोय. जेव्हा ही संधी अक्षय (संस्थापक आणि सीईओ, एक्सेलमोटो) आणि आमच्या कुटुंबासह - अहान आणि के. एल. राहुल - सोबत आली, तेव्हा आम्ही ती सोडू शकलो नाही..."

56
ई सायकल चालवायला सोपी

ई सायकल चालवायला सोपी असल्याचं यावेळी सुनील शेट्टीने बोलताना सांगितलं आहे. मला ही बाईक चालवताना आनंद होतो असं यावेळी अण्णा म्हणाला आहे. त्यानं इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे.

66
सुनील शेट्टीने काय केलं लॉंच

सुनील शेट्टीनं 'स्कूट' इलेक्ट्रिक सायकल लाँच केल्या आहेत. ज्यात स्कूटर स्टाईल डिझाइनसह पेडल असिस्ट आणि आरामदायी बेंच सीट आहे. हे उत्पादन विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिझाइन केलं आहे, जे स्वातंत्र्य, सुविधा आणि निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देतं.

Read more Photos on

Recommended Stories