स्मृती मानधनाच्या आहोंनी हातावर 'हा' टॅटू काढून केलं कौतुक, फोटो पाहून म्हणाल नवरा माझा नवसाचा

Published : Nov 04, 2025, 07:00 PM IST

भारतीय महिला क्रिकेट संघाने ४९ वर्षांनंतर वर्ल्डकप जिंकून इतिहास रचला. या विजयात स्मृती मानधनाने महत्त्वाची भूमिका बजावली. विजयानंतर, तिचा होणारा नवरा पलाश मुच्छलने तिच्यासाठी खास पोस्ट शेअर करत आपला आनंद व्यक्त केला, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

PREV
16
स्मृती मानधनाच्या आहोंनी हातावर 'हा' टॅटू काढून केलं कौतुक, फोटो पाहून म्हणाल नवरा माझा नवसाचा

भारतीय महिला संघाने वर्ल्डकपमध्ये विजय मिळवल्यानंतर संपूर्ण भारतात त्यांची चर्चा सुरु झाली आहे. 49 वर्षांत पहिल्यांदाच भारताच्या महिला क्रिकेट संघानं देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. 2 नोव्हेंबर रोजी टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेविरोधात फायनलचा सामना रंगला.

26
अंतिम सामन्यात स्मृती मानधनानं केली चांगली कामगिरी

अंतिम सामन्यात स्मृती मानधना हिने चांगली कामगिरी केली. तिने जवळपास ५८ चेंडूच्या बदल्यात ४५ धावा केल्या. विजयानंतर टीम इंडियावर आनंदाचा वर्षाव केला जात आहे.

36
स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट

स्मृती मानधनाचा होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यानं इंस्टाग्रामवर दोन पोस्ट शेअर केल्या आहेत. ज्यामध्ये त्यानं गर्लफ्रेंड स्मृती मानधनाचे फोटो शेअर केलेत आणि वर्ल्डकप 2025 जिंकल्याबद्दल आभार मानले आहेत.

46
काय पोस्ट शेअर केली?

पलाश मुच्छलनं इन्स्याग्रामवर पहिला फोटो शेअर केलाय, त्याच्या हातात ट्रॉफी दिसतेय, ज्यामध्ये त्याचा चेहरा दिसत नाहीय, पण स्मृती मानधना दिसते. त्यासोबत त्यानं कॅप्शन लिहिलंय की, "सबसे आगे है हम हिंदुस्तानी..."

56
ट्रॉफी हातात घेऊन दिली स्मृती

दुसऱ्या फोटोमध्ये पलाश मुच्छल क्रिकेटच्या मैदानात निळी जर्सी घातलेल्या स्मृती मानधनासोबत ट्रॉफी हातात घेऊन पोज देत असल्याचं पाहायला मिळालं. या पोस्टसह त्यांनी लिहिलंय की, 'मी स्वप्न तर पाहत नाही ना...' या फोटोंवर चाहत्यांनी फायर आणि हॉर्ट इमोजी शेअर केले आहेत.

66
SM18 चा दिसला टॅटू

फोटोमध्ये पलाश मुच्छलच्या हातावर SM18 चा टॅटू दिसतो. SM म्हणजे, स्मृती मानधना आणि 18 हा तिचा जर्सी नंबर आहे.

Read more Photos on

Recommended Stories