सोशल मीडियावर कलाकारांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार दीर्घकाळापासून सुरू आहेत. अशातच विद्या बालनचे नाव वापरून फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.
Vidya Balan Lodges FIR Over Impersonation : बॉलिवूडमधील अभिनेत्री विद्या बालन सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. आपल्या चाहत्यांच्या मनोरंजनासाठी अभिनेत्री नेहमीच फोटो-व्हिडीओ शेअर करते. पण विद्या बालनाच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. खरंतर विद्या बालनचे नाव वापरुन सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर एक अकाउंट तयार करण्यात आले आहे. याशिवाय अकाउंटच्या माध्यमातून सिनेसृष्टीतील व्यक्तींकडे पैशांची मागणी केली जात असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणात विद्या बालनने कठोर पाऊल उचलत मुंबई पोलिसात एफआयआर दाखल केला आहे.
विद्या बालनने दाखल केला एफआयआर
रिपोर्ट्सनुसार, विद्या बालनने मुंबईतील खार पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करणे आणि तिच्या नावे पैसे मागण्यासंदर्भात तक्रार केली आहे. असे सांगितले जातेय की, अज्ञात व्यक्ती विद्या बालनचे नाव वापरून नागरिकांना काम देण्याच्या बहाण्याने पैशांची मागणी करत होता. खार पोलिसांनी या प्रकरणात कलम 66 (C) आयटीअंतर्गत एफआयआर दाखल केला आहे.
काम देण्याच्या नावाखाली पैशांची मागणी
विद्या बालनच्या नावाखाली बनावट इंस्टाग्राम अकाउंट आणि ईमेल आयडी तयार करून सिनेसृष्टीतील संबंधित व्यक्तींना संपर्क केला जात होता. याशिवाय नोकरीचे आश्वासन देत त्यांच्याकडून अज्ञात व्यक्ती पैशांची मागणी करत होता. विद्या बालनला या प्रकाराबद्दल कळले असा तिने तातडीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, विद्या बालनच्या आधी महेश बाबूची मुलगी सितारा घट्टमेननीचे देखील बनावट इंस्टाग्राम अकाउंट तयार करण्यात आले होते. याची माहिती स्वत: महेश बाबू आणि त्यांची पत्नी नम्रता शिरोडकर यांनी दिली होती.
आणखी वाचा :
श्वेता तिवारीला मिळाला नवा पार्टनर? सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चा
मिमी चक्रवर्ती अभिनय सोडून बनली खासदार, आता राजकरणातूनही घेतली एक्झिट